Goa Assembly Monsoon Session राज्यातील पर्यटन क्षेत्राची उर्जितावस्था टिकवण्यासाठी अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान आदी भागांतून पर्यटक येण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत.
युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियन पर्यटकांची संख्या येथे घटली असून दुबईत रशियन पर्यटकांची संख्या वाढली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला सांगितले. याविषयी आमदार दिगंबर कामत यांनी प्रश्न विचारला होता.
कामत यांनी विचारणा केली की, वर्षाला १५ याप्रमाणे ७६ सोहळ्यांचे आयोजन खात्याने केले. त्या-त्या ठिकाणांहून किती पर्यटक आले, याची आकडेवारी आहे का?
रशियन युद्धामुळे पर्यटक घटले, त्यामुळे नव्या बाजारपेठा शोधल्या का? गोव्याचा ब्रॅण्ड जगभर माहीत आहे, त्यामुळे वेगळ्या प्रयत्नांचा विचार आहे का? जनसंपर्क यंत्रणेचे काय झाले?
या साऱ्या प्रश्नांना उत्तरे देताना पर्यटनमंत्री म्हणाले, समुद्रकिनाऱ्यांपलीकडील पर्यटन या संकल्पनेवर आधारित काम सुरू आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे.
देशांतर्गत पर्यटकांनाही गोव्यात नवे काय, हे सातत्याने सांगत राहावे लागते. जनसंपर्क एजन्सीने अपेक्षित काम न केल्याने ती बदलली जाईल.
पर्यटन वेळापत्रक जाहीर करावे
आमदार जीत आरोलकर यांनी पॅरीसमध्ये ‘पर्यटनाचा स्टॉल’ उभारला तेथे कुणीही फिरकले नाही, असे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, देशातील लोकांना गोवा काय हे ठाऊक आहे. त्यासाठी देशांतर्गत जाहिरातबाजी कशाला हवी. पर्यटन वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही, ते अशा बिगर हंगामातच जाहीर करायला हवे होते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.