Goa Assembly Protest: विधानसभेत फलक झळकावणे माजी मंत्री पाऊसकरांना भोवले, पाच जणांच्या अडचणीत वाढ; 300 पानी आरोपपत्र दाखल

Goa Assembly Protest Chargesheet: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रेक्षक गॅलरीत फलक झळकावून आंदोलन करणाऱ्या ५ जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Goa Assembly Protest Chargesheet:
former minister deepak pauskarDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रेक्षक गॅलरीत फलक झळकावून आंदोलन करणाऱ्या ५ जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या या आंदोलकांविरुद्ध पर्वरी पोलिसांनी म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ३०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात माजी मंत्री दीपक पाऊसकर यांचाही समावेश आहे.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ६ मार्च २०२६ रोजी, सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना मिराबाग येथील बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी काही आंदोलक प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. त्यांनी अचानक सरकारविरोधी घोषणाबाजी करत ‘आमका नाका बांध’ अशा आशयाचे फलक झळकावले होते. या प्रकारामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आला होता.

Goa Assembly Protest Chargesheet:
Goa Assembly Protest: विधानसभेबाहेरही आंदोलन! लेजिस्लेटिव डिप्लोमा दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ; विरोधकांचे टीकास्त्र

माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह हेमंत भंडारी, उमेश नाईक, उपेंद्र नाईक आणि आपा नाईक या पाच जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २१ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. विधानसभा सचिवालयाने या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दिली होती, ज्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या हे ३०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले असून, आता या ५ आंदोलकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com