मायकल लोबो
मायकल लोबोDainik Gomantak

Goa Assembly Monsoon Session : रसायनयुक्त फळांमुळे कर्करोग होण्याची भीती

मायकल लोबो : अन्न-औषध प्रशासनाकडून वारंवार तपासणी होणे आवश्यक
Published on

Goa Assembly Monsoon Session : म्हापसा बाजारात केळी पिकविण्याची जी पद्धत राबविली जात आहे, त्यासाठी रसायनाचा वापर केला जात असून, त्यामुळे कर्करोगी वाढविण्यास हा प्रकार मदत करीत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ठिकाणच्या फळविक्री करणाऱ्या ठिकाणच्या फळांची तपासणी करणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून अशा ठिकाणी वारंवार तपासणी होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली.

कळंगुट मतदारसंघातील आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील आणि गरीब लोक जातात. अपघात झाल्यानंतर रुग्णाला आरोग्य केंद्रात आणल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी न्यावे लागते.

त्याठिकाणी एक्स-रे मशीन उपलब्ध करावे. लाडली लक्ष्मीचे पैसे अजूनही आलेले नाहीत. ही रक्कम वेळेत आणि त्वरित मिळावी. त्याबाबत महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि वित्त खात्याशी बोलावे.

सरकारी प्राथमिक शाळा बंद आहेत, त्याठिकाणी अंगणवाडी सुरू करावी. बोंडला येथे जंगलसफर केव्हा सुरू होणार, हे मंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली.

मायकल लोबो
Goa Drugs Case: ड्रग्ज प्रकरणातील संशयित पाटलूची पुराव्यांअभावी केली निर्दोष सुटका

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांत वाढ

पाऊस अधिक पडत असल्याने डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू शकतात. त्यासाठी आरोग्य खात्याने पंचायत स्तरावरील आरोग्य केंद्रांना समन्वय साधून त्याविषयी उपाययोजना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगावे.

नेरुल, कांदोळी, कळंगुट, हडफडे या किनारी भागात स्थलांतरित कर्मचारी राहत आहेत, त्याठिकाणी डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढतात, याकडे लक्ष द्यावे.

मायकल लोबो
LIVE Goa Assembly Monsoon Session 2023 Day 8 : थेट विधानसभेच्या सभागृहातून | Goa Politics | CM

नव्या प्रादेशिक आराखड्याची गरज

नगर नियोजन मंत्री राणे यांनी ग्रामीण स्तरावरील विकास आराखडे आणण्याचे जाहीर केले आहे. हे आराखडे कसे असतील, याचे स्पष्टीकरण नाही.

२०२१ चा प्रादेशिक आराखडा हा २०११ मध्ये तयार झाला आहे आणि आता नव्या आराखड्याची गरज आहे.

त्यामुळे ग्रामीण पातळीवरील आराखडे आलेतर प्रादेशिक आराखड्याचे भविष्य काय, असा सवाल लोबो यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com