Goa assembly monsoon session 2024 Day 2: माफीवरुन गोंधळ, गुन्हेगारीबाबत लक्षवेधी; विधानसभेत आज काय घडले? वाचा अपडेट

Goa legislative assembly monsoon session 2024: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील अनेक विषय गाजले. माफीच्या मागणीवरुन कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
माफीवरुन गोंधळ, गुन्हेगारीबाबत लक्षवेधी; विधानसभेत आज काय घडले? वाचा अपडेट
Goa assembly monsoon session 2024 Day 2Dainik Gomantak
Published on
Updated on

पाऊस, पूर; आमदार देविया राणे यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चेला सुरुवात

पर्येच्या आमदार देविया राणे यांच्यासह इतर आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सभागृहात चर्चेला सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात निर्माण होत असलेल्या पूरस्थितीबाबत योग्य कारवाई करण्याची हमी दिली.

 गोव्यात आता भाडेकरू ठेवण्यासाठी पोलिस पडताळणी बंधनकारक

भाडेकरू ठेवताना त्याची व्यवस्थित पडताळणी करूनच ठेवा जर भाडेकरूंकडे पोलीस पडताळणी पत्र (Police Varification) नसेल तर त्या व्यक्तीला भाडेकरू करून न घेण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सभागृहात केली

(Goa CM Dr. Pramod Sawant reply to the Calling Attention raised by MLA Michael Lobo)

बाउन्सर्स नोंदणी आवश्यक

बाउन्सर्स ची कुठेही कायदेशीरपणे नोंदणी नाही. यासाठी सभागृहात बिल पास करावे लागेल. ज्यांना वैयक्तिक बाउन्सर्स ठेवायचे असतील त्यांनी त्यांची कायदेशीर नोंदणी करणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले

Goa assembly monsoon session: जागा खाली करण्यासाठी राज्याबाहेरील बाउन्सरांचा वापर - लोबो

बाहेरील लोक येतात, गोव्यात जमिनी खरेदी करतात आणि जागा खाली करण्यासाठी राज्याबाहेरील बाउन्सरांचा वापर करतात. त्याचा कसलाच पुरावा नसतो त्यांची व्यवस्थित चौकशी करून माहिती करून घेतली पाहिजे याकडे आमदार मायकल लोबो यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Calling Attention Motions: ड्रग्ज, खून! गोव्यातील गुन्हेगारी; लक्षवेधी सूचनांवर चर्चेला सुरुवात

लक्षवेधी सूचनांवरील चर्चेला अधिवेशनात सुरुवात झाली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी या राज्यातील गुन्हेगारी विषयावर त्यांचे मत मांडत आहेत. लोबो यांनी कांदोळीतील खूनाचे प्रकरण मांडून विषयाला सुरुवात केली.

 Altone D'costa: हक्कभंग विषयावर अखेर पडदा

हक्कभंग विषयावर अखेर पडदा पडला आहे.

दुसऱ्यांदा कामकाज तहकूब

एल्टन डिकॉस्तांवरील हक्कभंग प्रस्ताव वाद मिटेना. पुन्हा विधानसभा साडे बारा वाजेपर्यंत तहकूब.

स्पष्टीकरण दिल्याशिवाय कामकाज चालणार नाही - मुख्यमंत्री आक्रमक

एल्टन डिकॉस्ता यांनी स्पष्टीकरण दिल्याशिवाय विधानसभा कामकाज चालणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली.

एल्टनबाबतचा विषय आधी मिटवावा, स्पष्टीकरण द्यावे; सत्ताधारी पुन्हा आक्रमक

दुसऱ्या दिवशीही माफीवरुन गोंधळ, एल्टन डिकॉस्ता यांनी हा विषय सुरुवातीली मिटवावा त्यानंतरच सभागृह सुरु राहिलं. यावरुन सभागृहात दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी एल्टन यांनी माफी मागण्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला.

Goa assembly monsoon session: सभापतींचा अवमान अजिबात सहन करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा देत सभापतींचा अवमान सहन करणार नसल्याचे म्हटले आहे. पहिल्या दिवशी यावरुन गदारोळ झाल्याने प्रश्नोत्तराचा तास वाया गेला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय होणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com