राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली राज्यातील नद्या केंद्र सरकारला विकल्याचा घणाघात विरोधी पक्षातील आमदारांनी केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. आधी तारांकित प्रश्नाचे उपप्रश्न रद्द केल्यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक दिसले. त्यानंतर राष्ट्रीयीकरणाच्या माध्यमातून राज्यातील नद्या सावंत सरकारने केंद्र सरकाला विकल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील आमदारांनी हल्लाबोल केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. तर विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा समोर आले.
चरावणे धोरणासंदर्भात आमदार डॉ. देविया राणे सतत पाठपुरवठा करत आहेत. यासंबंधी मुख्यमंत्री, वनमंत्री विश्वजीत राणे व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर पुढील प्रक्रिया ठरवूया. देविया राणेंच्या खासगी ठरावावर बोलताना मंत्री शिरोडकरांचे प्रतिपादन.
गोवा अभिलेखागार हे आशियातील सर्वात जुने आहे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र अभिलेखागार इमारतीची गरज आहे. सध्या रायबंदर येथे भाड्याच्या जागेत स्थलांतरित केलेल्या संग्रहित दस्तऐवजांची स्थिती कशी आहे याची माहिती सभागृहाला द्यावी. आमदार कार्लुस फेरेरा यांची मागणी.
राज्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सरकार सकारात्मक. नियोजन आणि सांख्यिक संचालनालयाला संबंधित निर्देश दिले आहेत. केपे, काणकोण, सावर्डेसारख्या तालुक्यांमध्ये सरकारच्या सेवा पोहोचवण्यास तिसरा जिल्हा महत्वाचा ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत प्रतिपादन.
गोवा फॉरवर्डचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी झुआरी जमीन घोटाळा प्रकरणाचा मोठा पर्दाफाश केला. औद्योगिक प्रयोजनासाठी असलेली जमीन एक लाखापेक्षा जास्त किमतीत निवासी कारणांसाठी विकली गेली. त्यांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यापुढे जमीन विकू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कचरा वाहतूकीसाठी हॉटेल आणि उद्याोगांमधील नोंदणी केलेल्या खासगी कंत्राटदारांचे परवाने रद्द केले जातील. सर्व खासगी कंत्राटदारांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
तारांकित प्रश्नाचे उप प्रश्न सभागृहाच्या कामाकाजातून डिलीट करण्यात आले. यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सत्ताधारी आमदार यांच्यात खडाजंगी. शेवटी सभापती रमेश तवडकर यांनी आपण यावर तोडगा काढतो असे सांगत मध्यस्थी केली.
राज्यात मागील दोन दिवसात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. काल (1 ऑगस्ट) पर्येच्या आमदार देविया राणे यांनीही अधिवेशनादरम्यान सत्तरीसह राज्यातील विविध भागातील पूरसदृश्य स्थितीवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली. याशिवाय, विरोधकांनी राज्यातील इतर विविध मुद्यांवरुन सरकारला घेरले. आमदार जीत आरोलकर यांच्याकडून विधानसभेत लक्ष्यवेधी काळात राज्यात काजूच्या उत्पादनात घट झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृषी संचालकांना लक्ष घालण्यास सांगतो असे म्हणाले. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्यांवरुन खडाजंगी पाहायला मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.