Goa Assembly Monsoon Session 2024: विधानसभेचे आजपासून अधिवेशन! विरोधकांची कसोटी; एकजूट दिसणार का?

Goa Assembly Monsoon Session 2024: आजपासून विधानसभा अधिवेशन : अनेक प्रश्‍न ऐरणीवर
विधानसभेचे आजपासून अधिवेशन! विरोधकांची कसोटी; एकजूट दिसणार का?
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळी अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विरोधी आमदारांच्या कामगिरीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण मिळालेल्या वेळेत विरोधक म्हणून जी व्यूहरचना ठरविणे आवश्‍यक आहे, ती करण्यात विरोधी आमदारांना अपयश आल्याचे दिसत आहे.

वारंवार बैठका घेऊनही सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्याचे तंत्र विरोधी आमदारांना अंमलात आणता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे विरोधी गटात ‘इंडिया’ आघाडीच्या आमदारांमध्ये एकजूट झाली असली, तरी विरोधी असलेल्या एकमेव ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या (आरजी) आमदाराला आता विरोधक म्हणून एकहाती किल्ला लढविण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.

शुक्रवारी विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्याचवेळी पर्यटन मंत्र्यांनी पर्यटनासंबंधी बोलाविलेल्या बैठकीला ‘आप’च्या आमदारांनी हजेरी लावल्याने ती बैठकच होऊ शकली नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून विरोधी आमदारांना एकत्र न आणण्याचा हा डाव यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

एक प्रबळ विरोधक म्हणून गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई जनता दरबार घेतात, तर तीन आमदार असणाऱ्या काँग्रेसला जनतेकडून प्रश्‍न मागविण्याचे किंवा दरबार भरविण्याची इच्छाही होत नाही.

विरोधी पक्षनेते म्हणून युरी आलेमाव यांनी आपण कोणते खासगी ठराव आणणार असल्याचे जाहीर केलेही असतील, पण अधिवेशनासाठी विरोधक एकत्रितरित्या सज्ज असल्याचे दाखविण्याची जी संधी होती, ती विरोधी आमदारांनी गमावली आहे.

विधानसभेचे आजपासून अधिवेशन! विरोधकांची कसोटी; एकजूट दिसणार का?
Goa Weather Update: गोव्यात रेड अलर्ट! शाळांना सुट्टी, धरणे ‘ओव्हर फ्लो’च्या दिशेने, पडझडीच्या घटना सुरुच

‘आरजी’चा आमदार लढवणार किल्ला

मी आणि कार्लुस फेरेरा संयुक्तिकरित्या नव्या राष्ट्रीय शिक्षणावर प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. गोव्यात सर्वाधिक बेरोजगारी आहे. रोजगार निर्माण करायचे असतील तर चांगले शिक्षण हवे. विरोधी आमदारांची बैठक बोलविण्याचे विरोधी पक्षनेत्यांचे काम आहे. परंतु मी विरोधी आमदारांसोबत आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात जे विषय आणि प्रश्‍न आले होते, ते अद्याप सुटलेले नाहीत. अलीकडच्या अनेक विषयांवर विरोधक म्हणून आम्ही सभागृहात निश्‍चित सरकारला जाब विचारू. आमचा गट एकत्र आहे. विरोधी पक्षातील आमदार म्हणून आमची कामगिरी पार पाडत आहोत, असे व्हेन्झी व्हिएगस म्हणाले.

मडगाव बैठकीत अधिवेशन रणनीती ठरली आहे. त्या बैठकीत अधिवेशनातील प्रत्येकाची भूमिका समजून घेण्यात आली. कोणते ठराव, प्रश्‍न मांडायचे, त्यावर चर्चा झाल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ने प्रथमपासून जी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून या अधिवेशनापूर्वी मला विश्‍वासात का घेतले नाही हे ठाऊक नाही; परंतु मला या बैठकीला बोलावले नव्हते, असे वीरेश बोरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com