अस्मिताय दिस, जखमी गायींसाठी तीन महिन्यात धोरण, भाडेकरु पडताळणी विधेयक; पाचव्या दिवशी सभागृहातील महत्वाच्या घोषणा

Goa legislative assembly monsoon session 2024: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात अनेक महत्वाच्या घोषणा झाल्या.
Goa Assembly Monsoon Session 2024 Day 5 Live: ओपिनियन पोल दिन 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करण्यासाठी आलेमाव यांचा खाजगी सदस्य ठराव
Goa Assembly Monsoon Session 2024 Day 5 LiveDainik Gomantak
Published on
Updated on

मत्स्यव्यवसाय आणि मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी विविध मागण्यांवर काय उत्तर दिले?

१) जखमी गायी आणि इतर भटक्या प्राण्यांसाठी सरकार येत्या तीन महिन्यात धोरण तयार करणार.

२) मच्छीमारांना मूल्यवर्धित करात सवलत देण्यास राज्य सरकार यावर्षीपासून सुरुवात करणार. यासाठी आवश्यक निधीची तरदूत अर्थसंकल्पात केली जाणार.

३) पीएमएसवाय अंतर्गत राज्यातील फिशिंग जेट्टी अद्यावत करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागाचा डिपीआर तयार करण्यात आला असून निधीसाठी तो केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

मासळीचे दर परवडेनात, दिगबंर कामतांनी व्यक्त केली चिंता

गोव्यात मासळीचे दर परवडेना झालेत. सामान्य व्यक्तीला मासे खाणे अवघड झाल्याचे दिगंबर कामत यांनी चिंता व्यक्त केली.

मिरामार पशुवैद्यकीय रुग्णालयाची अवस्था दयनीय

टोंका मिरामार येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था. लवकरात लवकर या रूग्णालयाची दुरूस्ती आवश्यक. हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फरेरा यांनी सभागृहात केली मागणी

गोवा भाडेकरू पडताळणी विधेयक येणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात भाडेकरु पडताळणी विधेयक २०२४ मांडले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. याप्रकरणी आलेक्स रेजिनाल्ड यांनी खासगी ठराव मांडला होता. याला सभागृहातील विविध आमदारांनी समर्थन दिले.

जनमत कौल दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्य सरकार जनमत कौल दिवस अस्मिताय दिस म्हणून साजरा नियमित करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. त्यानंतर विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांचा खासगी सदस्य ठराव मागे घेतला.

जनमत कौल दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करा, आलेमाव यांचा खासगी ठराव

जनमत कौलाचा दिवस (१६ जानेवारी) अस्मिताय दिस म्हणून राज्यपातळीवर साजरा करावा, यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी खासगी ठराव मांडला आहे. या विषयाचे राजकारण न करता सर्वांनी याला समर्थन द्यावे असे आवाहन आलेमाव यांनी सभागृहात केले.

डिचोली मतदारसंघात पाणीटंचाई, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी वेधले लक्ष

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये तसेच डिचोली मतदारसंघात होणाऱ्या पाणीटंचाई प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सध्याच्या 800 घनमीटर क्षमता असलेल्या पाणीसाठ्याची दुरूस्ती आणि मजबूती करण्याची गरज आहे.

तसेच 3 कोटी 23 लाख 45 हजार 989 रूपये खर्च करून 2000 घनमीटर क्षमता असलेला पाणीसाठा मये मतदारसंघात बनविण्यात येणार. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सभागृहात ग्वाही.

मये मतदारसंघाला मिळणार नविन पाणीसाठा

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये तसेच डिचोली मतदारसंघात होणाऱ्या पाणीटंचाई च्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले कि सध्याच्या ८०० घनमीटर क्षमता असलेल्या पाणीसाठ्याची दुरूस्ती आणि मजबूती करण्याची गरज आहे.

तसेच ३ कोटी २३ लाख ४५ हजार ९८९ रूपये खर्चून २००० घनमीटर क्षमता असलेल्या पाणीसाठा मये मतदारसंघात बनविण्यात येणार आहे त्यामुळे पाणीटंचाई चा प्रश्न सुटेल

चतुर्थीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई!

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. चतुर्थीपुर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई. कृषी अधिकारी सर्व भागात जाऊन नुकसानीचा पंचनामा करतील. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची विधानसभेत ग्वाही.

पावसाळ्यात घराची मोडतोड झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन देणार २ लाख रूपये

ज्यांच्या घरांना किंवा फ्लॅट्सना नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाली असेल त्यांना आपत्ती व्यवस्थापनाकडून २ लाख रूपये मदत सरकार करेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विजय सरदेसाई यांच्या प्रश्नावर सभागृहात दिली

खर्गवाल कंपनीचे एमपीटीसोबतचे लीज डीड बेकायदेशीर!

२०१० साली एमपीटीने मरिना प्रकल्पासाठी खर्गवाल कंपनीसोबत केलेले लीज डीड बेकायदेशीर. कारण वॉटर फ्रंटची मालकी एमपीटीकडे नाहीच‌. त्यामुळे खर्गवाल कंपनीला मिळालेला मरिना प्रकल्प रद्द करावा. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंची सभागृहात मागणी.

CM Dr. Pramod Sawant:...तर मान्यता देण्यास हरकत काय?

आम्ही मरिना प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही. मरिना प्रकल्प हा हरित प्रकल्प आहे. हरित प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार असेल तर त्याला मान्यता देण्यास काय हरकत आहे? मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत प्रतिपादन.

Goa Assembly Live Session Today Watch Here

Nauxim Marina Project: नावशीतील प्रस्तावीत मरिना प्रकल्पावर अजून निर्णय नाही

नावशीतील मरिना प्रकल्पावर सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही वा त्यांना कसलीही परवानगी दिलेली नाही. आमदार क्रुझ सिल्वांच्या प्रश्नावर पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरांचे उत्तर.

ओपिनियन पोल दिन 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करण्यासाठी आलेमाव यांचा खाजगी सदस्य ठराव

ओपिनियन पोल दिन हा एक महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी गोमंतकीयांनी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले. हा दिवस "अस्मिताय दिस" म्हणून राज्यपातळीवर साजरा करणे आवश्यक आहे. त्यावर मी खाजगी सदस्य ठराव मांडला आहे आणि मला आशा आहे की सर्व आमदार या ठरावाला पाठिंबा देतील - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com