गोवा सरकारने १ हजार ४२३ तात्पुरती महसूल अधिक्य (Provisional Revenue Surplus) अर्थसंकल्प मांडला आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कर्जाची मर्यादा ४ हजार २०० कोटी असताना आम्ही फक्त २ हजार ६७ कोटींचे कर्ज घेतले आहे. १ एप्रिल ते आजपर्यंत एकाही रुपयाचे कर्ज घेतलेले नाही. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची विधानसभेत माहिती.
हाऊसिंग बोर्ड मार्फत ग्रामीण भागातील गरिबांना सवलतीच्या दरात फ्लॅट देणे शक्य नाही. त्याऐवजी सरकारने सभापती तवडकरांच्या 'श्रमधाम' योजनेसाठी आर्थिक तरतूद करावी. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंची विधानसभेत मागणी.
अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना विरोधी पक्षनेते युरी आमेमाव यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकत म्हादईवर देखील भाष्य केले. म्हादई वाचविण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी केली.
सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली असून, आपचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.
सरकारचा 'हर घर जल'चा दावा खोटा. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची जोडणी देखील नाही. आमदार विजय, विरेश आणि फेरेरांकडून विधानसभेत संयुक्त लक्षवेधी. सरकारला धरले धारेवर.
राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या जटील. पुढील दोन ते तीन महिन्यात एनजीओ तसेच विरोधी आमदारांना विश्वासात घेऊन सरकार धोरण तयार करेल. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.
राज्यात भटक्या कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे आमोणकरांनी मांडलेल्या समस्येत म्हटलंय. यावर विविध आमदारांनी सूचना केल्या असून, योग्य उपयायोजनांची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी देखीस त्रास होत असल्याचे आमदारांनी नमूद केले.
राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकरांनी लक्षवेधी मांडली आहे. जीत आरोलकर, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, चंद्रकांत शेट्ये यांनी मत आणि सूचना केल्या.
गेल्या ४ वर्षांत पर्यटन खात्याकडून रोड शोजवर तब्बल ६३ कोटींचा खर्च. ६३ पैकी ३० कोटी भारतातील रोड शोवर तर ३३ कोटी आंतरराष्ट्रीय रोड शोजवर खर्च. विजय सरदेसाईंच्या प्रश्नावर पर्यटन खात्याचे लेखी उत्तर.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या प्रचारासाठी पर्यटन खात्याने चार कोटी खर्च केले. मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याचा आदेश ओव्हर रुल करुन खर्चाला मान्यता दिली. 'शहाजहान' आणि यांचे हे जॉयंट व्हेंचर. 'शॉन इव्हेंट्स' बनलाय सरकारी जावई. विजय सरदेसाईंचा घणाघात.
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुळगाव येथे ठरलेल्या जागेतच लवकरात लवकर पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असल्याचे उत्तर दिले.
मुळगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी घेतलेली १७ हजार २८० चौरस जागा पडून. २०२० साली पायाभरणी केल्यानंतर काहीच झाले नाही. सरकार या रूग्णालयाबद्दल गंभीर आहे का असा तारांकित सवाल डिचोली चे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सभागृहात केला.
तिसऱ्या दिवशीचे काम सुरु होताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
पहिल्या दोन दिवसांच्या प्रश्नोत्तराचा काळ माफीच्या मागणीवरुन वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणत्या प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.