Goa Assembly Monsoon Session 2024: विरोधकांनी गाजवला पहिला दिवस; दोनवेळा कामकाज तहकूब, सभागृहातील ठळक घडामोडी

Goa Assembly Monsoon Session 2024 Day 1: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवारी) सुरु होत आहे.
Goa Assembly Monsoon Session 2024: विरोधकांनी गाजवला पहिला दिवस; दोनवेळा कामकाज तहकूब, सभागृहातील ठळक घडामोडी
Goa Assembly Monsoon Session 2024 Day 1Dainik Gomantak
Published on
Updated on

अर्धसंकल्पावरील चर्चेत आमदारांचा सहभाग

मायकल लोबो, आलेक्स रेजिनाल्ड, प्रेमेंद्र शेट, नीलेश काब्राल, चंद्रकांत शेट्ये, गणेश गावकर यांच्यासह कार्लुस फेरेरा या आमदारांनी अर्धसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. काही आमदारांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवत काही तरतूदींचे कौतुक केले.

चोडण, नार्वे भागात विस्कळीत पाणीपुरवठा - आमदार प्रेमेंद्र शेट

चोडण आणि नार्वे सारख्या भागात पिण्याचे पाणी २ ते ३ दिवसाने येते. त्यांना दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी मये मतदारसंघात जल शुद्धिकरण प्रकल्पाची गरज आहे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सभागृहात केली

कला अकादमीवरुन गावडेंना लोबोचे शालजोडीतून फटके

कला संस्कृती मंत्री चांगले कलाकार पण, कला अकादमी अद्याप व्यवस्थित सुरु झालेली नाही. ते विविध पात्र साकारतात. कधी ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज होतात. कला अकादमीत मी गेस्ट म्हणून गेलो असता त्यावेळी ८० हजार खर्च करून साउंड सिस्टिम बाहेरुन आणावी लागली. कला अकादमीचा विषय तडीस नेणे गरजेचे आहे - आमदार मायकल लोबो

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सभागृहात सर्वसाधारण चर्चा सुरु झाली आहे. याबाबत माझी मंत्री कुडचडेचे निलेश काब्राल यांनी विचार मांडल्यानंतर मायकल लोबो यांनी भाषण केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सादर केली बाबा आमटेंची कविता 

आमदार विजय सरदेसाई आणि कार्लुस फेरेरा यांनी सरकारी इमारतीमध्ये दिव्यांगांना सुविधा आणि प्रवेशयोग्य करण्याबाबत लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा संदर्भ देत त्यांचा कार्य मोठे असल्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी

"शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही."

ही बाबा आमटे यांची कविता सादर केली.

दिव्यांग लोकांसाठी सरकारी इमारती सुलभ आणि प्रवेशयोग्य करण्याबाबत सरदेसाईंचा प्रश्न

राज्यातील सरकारी इमारती दिव्यांग लोकांसाठी सुलभ आणि प्रवेशयोग्य करण्याबाबतचा प्रश्न आमदार विजय सरदेसाईंनी उपस्थित केला. यावर डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना सरदेसाईंनी एका मंत्र्याचा संदर्भ देत राज्यात 33,012 दिव्यांग नागरिक असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. कला अकादमी, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दिव्यांग लोकांसाठी सुलभ आणि प्रवेशयोग्य नाही.

Sal River: साळ नदी प्रदुषित होण्यापासून वाचवा - वेंझी व्हिएगस

साळ नदी प्रदुषित होण्यापासून वाचवा अशी, विनंती बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी सभागृहात केली. सांडपाणी नदीत सोडल्याने नदी प्रदुषित होत असल्याचा आरोप व्हिएगस यांनी केला.

Mercem Gas Leak: मेरशीतील क्लोरिन गळतीचा मुद्दा फर्नांडिस यांच्याकडून उपस्थित

मेरशीत क्लोरिन गळतीचा मुद्दा सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. सरकारने याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली.

MPA Vasco: एमपीए पोर्टवरुन आमदार आमोणकरांवर सरदेसाईंचा हल्लाबोल

मुरगाव बंदरात आमदार संकल्प आमोणकरांच्या हस्तक्षेपांवरुन टीका केली. सरकारने याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सरदेसाईंनी विविध वृत्तपत्रांचा दाखला दिला. यावरुन मुख्यमंत्री सावंत यांनी विषयाचे निराकरण झाल्याचे सांगितले. तसेच, वृत्तपत्र हे प्रूफ नसल्याचे सावंत म्हणाले.

त्यांनी माफी मागावी - मुख्यमंत्री आक्रमक

सभापती रमेश तवडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी उचलून धरली. यावरुन सभागृहात गोंधळ झाला.

House Adjourned: पहिल्याच दिवशी विरोधकांचा गोंधळ, कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब

एल्टन डिकॉस्ता यांनी मांडलेल्या एसटी आरक्षणाच्या विधेयकावरुन सभापती रमेश तवडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी केली. यावरुन आल्तन यांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लावून धरली. विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर अखेर सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात सुरु असलेल्या पाऊस आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

Goa Assembly Monsoon Session 2024: गोवा विधानसभेचे आजपासून अधिवेशन

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विविध विषयांवर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com