'साखर कमी झालीय वाटतं', मंत्री फळदेसाई उत्तर देतानाच त्रास होतोय म्हणाले अन् आलेमाव, गावडे, फर्नांडिस धावत आले

सुरूवातीला काही उत्तरे दिल्यानंतर स्कॉलरशिपबाबत उत्तर देत असताना, त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी पाणी पिले.
Goa Assembly Monsoon Session 2023 | Minister Subhash Phaldesai
Goa Assembly Monsoon Session 2023 | Minister Subhash Phaldesai

Goa Assembly Monsoon Session 2023: गोवा पावसाळी अधिवेशनाच्या पंधराव्या दिवशी मागण्या आणि कपात सूचना मांडल्यानंतर सामाजिक कल्याण, नदी जलवाहतूक, पुरातत्व आणि अभिलेखागार खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उत्तरं द्यायला सुरूवात केली.

सुरूवातीला काही उत्तरे दिल्यानंतर स्कॉलरशिपबाबत उत्तर देत असताना, त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी पाणी पिले. उत्तरला पुन्हा सुरूवात केल्यानंतर त्यांना त्रास होत असल्याचे जाणवले आणि त्यांनी सभापतींना याची माहिती दिली. 'साखर कमी झाल्यासारखे वाटतं' असे म्हणत मंत्री फळदेसाई खूर्चीवर बसले.

सभागृहात नेमकं काय घडलं?

मंत्री सुभाष फळदेसाई त्यांच्या खात्याशी संबधित आमदारांनी उपस्थित केलेल्या मागण्या आणि कपात सूचनांवर उत्तर द्यायला उभे राहिले. सुरूवातीला काही उत्तरे दिल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी पाणी पिले. पण, त्यानंतर बोलताना पुन्हा त्यांना त्रास व्हायला लागल्याने त्यांनी थोडं थांबून आपल्याला त्रास होत असल्याची कल्पना सभापतींना दिली. तसेच, 'साखर कमी झाल्यासारखे वाटतं' असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

सभापतींसह सर्वांनी त्यांना खूर्चीवर बसण्यास सांगितले, त्यानंतर मार्शेल त्यांच्या जवळ आले व विचारपूस केली. त्याचेळी मंत्री गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस फळदेसाई यांच्या आसनाजवळ जात त्यांची विचारपूस केली.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Minister Subhash Phaldesai
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 15: फळदेसाईंना अचानक सुरु त्रास, CM सावंतांनी दिली उत्तरं, असा होता आजचा दिवस

फळदेसाई यांना सभागृहाच्या बाहेर तब्येत बरी आहे का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता आता ठिक असल्याचे फळदेसाई म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी संभाळली कमान

फळदेसाई यांना अचानक त्रास व्हायला लागल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी थांबविण्यात आले. त्यानंतर विश्रांतीसाठी फळदेसाई बाहेर गेल्यानंतर उत्तराची जबाबदारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संभाळली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत फळदेसाई यांच्या खात्यासंबधित उपस्थित प्रश्न आणि मागण्यांवर भाष्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com