Goa Assembly Monsoon Session 2023 : विधानसभेच्या गॅलरीतून; रवींची फटकेबाजी!

पावसाळी अधिवेशनाचा सोमवारचा पाचवा दिवस.
 Agriculture minister Ravi Naik
Agriculture minister Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाचा सोमवारचा पाचवा दिवस. आज कृषी खात्याचे प्रश्न होते. सध्या हे खाते मंत्रिमंडळातील सर्वात बुजुर्ग मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक सांभाळत आहेत. वार्धक्याने मंत्री रवी नाईक थकले असले तरी राज्यातील अनेकांना त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या थरार गोष्टी माहिती असतील.

राज्यातील गुंडगिरी मोडून काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दिलखुलास कोट्या आणि खुमासदार वक्तव्ये यासाठी प्रसिद्ध बनले आहेत. त्यांची भाषणेही तितकीच लोकांची करमणूक करणारी असतात. ते साधे-साधे प्रश्न घेऊन लोकांना सरळ भिडतात.

भारतीय राजकारणात लालुप्रसाद यादव असे बोलत असत. प्रश्न काहीही असो आपल्याला काय सांगायचे आहे तेवढेच आणि तेही खुमासदार शैलीत सांगण्याची लालुप्रसादांकडे जितकी हातोटी आहे, तितकीच रवी नाईक यांच्याकडेही आहे, असे म्हणावे लागेल.

आज त्यांनी कृषी खात्याच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे सभागृहास नव्हे तर साऱ्या राज्याला हसवणारी ठरली. त्यामुळे मंत्री-आमदारांसह सारे सभागृह पहिल्यांदाच हास्यकल्लोळात बुडाले.

 Agriculture minister Ravi Naik
Goa Assembly Monsoon Session 2023 : कोणत्या आमदारांनी विधानसभेत काय केली सूचना...

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आपल्या अनुदानाचा प्रश्न विचारण्यापूर्वी राज्यात यापूर्वी झालेल्या ‘सेव्ह सॉईल’ कार्यक्रमावर किती खर्च केला? असा प्रश्न विचारला यावर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मूळ प्रश्नाला धरून नाही, असे सांगितले.

त्यात प्रश्न विचारताना, डॉक्टर ‘सेव्ह ऑइल’ म्हणाले, त्यामुळे सभागृहात सारेच कन्फ्युज झाले. नंतर त्यांनी दुरुस्ती केली. मग आपल्या मतदारसंघातील थकित शेतकऱ्यांचे अनुदान कधी देणार? असा प्रश्न विचारला. आपल्याला सरकारकडे फंड उपलब्ध नाही अशी माहिती मिळाल्याचे सांगितल्यानंतर नाईक यांनी कानाला हेडफोन लावत पुन्हा विचारा. काय म्हणताय डॉक्टर, असे विचारले.

यावर सभापतींनी त्यांना संभाळून घेत आमदार शेट्ये यांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यांनी प्रश्न विचारल्यावर फटकेबाजी करत आपल्या सरकारकडे भरपूर पैसे आहेत, असे सांगत सर्व शेतकऱ्यांचे पैसे वेळेत दिले जातील, असे सांगितले.

अर्थात मंत्री नाईक यांची हे सांगण्याची पद्धत काहीशी वेगळीच असल्याने त्यांच्या प्रत्येक शब्दाला सभागृहात हास्यकल्लोळ होत होता. त्यात मुख्यमंत्र्यांसह सारेच बुडाले होते. त्यानंतर नागरी पुरवठा खात्याच्या प्रश्नाबाबतही मंत्री नाईक यांनी अशीच फटकेबाजी करत खात्याकडून पुरवठा करण्यात आलेल्या खराब धान्याची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

 Agriculture minister Ravi Naik
Deviya Rane on Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्प झाल्यास तब्बल 15 हजार लोकांवर परिणाम होण्याची शक्यता!

अर्थात यावेळीही नाईक यांची कोट्या करण्याची आणि ते सांगण्याची गंमतदार शैली सभागृहात हशा पिकवणारी होती. एकूणच काय प्रश्नोत्तर तासात आज रवी नाईक यांनी बाजी मारली. अर्थात ते सभागृहातील वरिष्ठ सदस्य आणि मंत्री असल्याने त्यांच्याकडून अधिकच्या ज्ञानार्जनाची अपेक्षा होती, ती मात्र बाजूलाच राहिली.

कचरा व्यवस्थापन प्रश्नावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस यांनी सरकारला कोंडीत पकडत प्रश्नांचा भडिमार केला. अर्थात कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात त्यांनी अगोदरच राज्यात बेकायदेशीर भंगारअड्डे चालत असून त्यासाठी धोरण बनवत असल्याचे सांगितल्याने विरोधकांच्या प्रश्नांमधली धार कमी झाली होती.

मात्र, राज्यात बेकायदा भंगार अड्डे चालू असून त्यांचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी सरकारकडे कोणतीच यंत्रणा नाही, ही गंभीर बाब आज सभागृहासमोर आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com