Goa Assembly Monsoon Session: औद्योगिक वसाहतीत 40 हजार चौरस मीटर जागेवर अतिक्रमण - विरोधकांचा आरोप

विरोधकांचा आरोप ः डिजिटल सर्व्हेनंतर कारवाई करणार ः गुदिन्हो
mauvin godinho
mauvin godinho Sandip Desai
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session राज्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये साधनसुविधांचा प्रचंड अभाव असून अनेक कंपन्यांनी सुमारे 40 हजार चौ. मी. जमिनीवर अतिक्रमण केले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज सभागृहात केला.

यासाठीच उद्योग खात्यातर्फे डिजिटल सर्व्हे करण्यात येत असून सर्व्हेचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर धोरण निश्चित केले जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल. मात्र, तूर्तास या विषयावर कारवाईचे आश्वासन देऊ शकत नाही, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सभागृहात प्रश्नोत्तर तासाच्या वेळी दिली.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आज सभागृहात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण आणि प्रदूषण याविषयी प्रश्न विचारला होता. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणे, प्रदूषण आणि त्याचा स्थानिकांना होणारा त्रास या मुद्यांवर उद्योगमंत्री गुदिन्हो यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

युरी आलेमाव यांचा आरोप ः प्रदूषणावरून मंत्र्यांना घेरले

परप्रांतीय कामगारांची गरज

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत २०० हून अधिक परप्रांतीय कामगार आहेत. ते परिसर गलिच्छ करतात. हे प्रकार बंद करावेत, असल्या कामगारांची आम्हाला गरज नाही असे युरी आलेमाव म्हणाले. यावर गुदिन्हो यांनी आलेमाव यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत सर्वच उद्योगांना कामगारांची गरज भासते.

त्यात आतले - बाहेरचे असे करता येणार नाही. मात्र, सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना गावामध्ये जागा न देता औद्योगिक वसाहतींमध्येच जागा देण्यात आली आहे.

माशांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत स्थानिक कामगार मिळत नाहीत. त्यामुळे परप्रांतीय कामगारांची आवश्यकता भासते, असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले.

mauvin godinho
Mauvin Godinho: राज्य सरकार 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली एकूण 520 वाहने करणार स्क्रॅप; 95.85 कोटी रूपये खर्च

औद्योगिक वसाहतींमधील साधनसुविधा, नियमितता आणि वस्तुस्थिती लक्षात घ्यावी यासाठीच उद्योग खात्याच्यावतीने डिजिटल सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत.

यात अतिक्रमणाचीही बाब आहे. अर्थात या अतिक्रमणाच्या बाबतीत अद्यापही ठोस धोरण नाही. ते धोरण निश्चित करून यावर कारवाई करता येईल. तूर्तास सरसकट कारवाई करता येणार नाही. - माविन गुदिन्हो, उद्योगमंत्री

mauvin godinho
Deodhar Trophy 2023 : ‘देवधर’ मैदानावर दीर्घ कालावधीनंतर गोव्याचा खेळाडू; अर्जुन तेंडुलकरला संधी

पंचायतींना मिळणार अभियंते, संगणक ऑपरेटर

पंचायत संचालनालयामार्फत राज्यातील पंचायतींना अभियंते व संगणक ऑपरेटर देण्याची घोषणा आज पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत केली. अनेक पंचायतींमध्ये सचिव आणि ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत, शिवाय अभियंते आणि संगणक ऑपरेटरांचीही आवश्यकता आहे.

सध्या अभियंते व संगणक ऑपरेटरची कामे सचिव आणि ग्रामसेवक करतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भविष्यात अडचण येऊ शकते, अशी भूमिका आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मांडून या स्वतंत्र पदांची मागणी केली. यावर पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी ही बाब मान्य करून ही पदे भरण्याची तत्त्वतः मान्यता दिली.

mauvin godinho
Goa Police News: घरफोडी करणाऱ्यास पाठलाग करून पकडले, ओल्ड गोवा पोलिसांची कामगिरी

साधनसुविधांचा अभाव

औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांकडून नियमांचे पालन केले जात नाही. साधनसुविधांचा अभाव आहे. कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार काम करतात. यावर कोणती कारवाई केली? हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला.

23 पैकी 18 वसाहतींचे सर्वेक्षण पूर्ण

यावर उद्योगमंत्री गुदिन्हो म्हणाले, राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये अतिक्रमण झाले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्या आहेत. यासाठीच खात्याच्यावतीने राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये डिजिटल सर्व्हेचे काम करण्यात येत आहे. राज्यात 23 औद्योगिक वसाहती आहेत. त्यापैकी 18 वसाहतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com