Leander Paes
Leander PaesDainik Gomantak

Goa Assembly Election: लिएंडर पेसने स्थानिक मच्छिमारांशी साधला संवाद

लिएंडर पेस (Leander Paes) यांनी आज आपल्या या बदललेल्या क्षेत्राबद्दल सांगताना म्हटले, गेली 30 वर्षे मी टेनिस खेळातून देशाची सेवा केली.
Published on

मडगाव: टेनिस (Tennis) कोर्ट सोडून राजकीय कोर्ट पकडलेल्या भारतीय टेनिस स्टार लिएण्डर पेस (Leander Paes) यांनी आज आपल्या या बदललेल्या क्षेत्राबद्दल सांगताना म्हटले, गेली 30 वर्षे मी टेनिस खेळातून देशाची सेवा केली. आता मला तेच काम राजकीय मैदानावरून करायचे आहे. माझे पूर्वीचेच काम चालू आहे मी फक्त मैदान बदलले आहे. आज त्याने वेळ्ळी या गावात स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या बरोबर तृणमूलचे स्थानिक नेते आंतोनियो क्लोविस तसेच राजेंद्र काकोडकर (Rajendra Kakodkar) हे उपस्थित होते. त्याने स्थानिक मच्छिमारांशीही संवाद साधला. लिऍण्डरचा जन्म जरी कोलकाता येथील असला तरी त्याचे वडील डॉ. व्हेस पेस हे वेळ्ळी गावचे सुपुत्र होते. त्यामुळे लिऍण्डर म्हणाला, मला माझ्या जन्मभूमीत आल्याचा आनंद होत आहे. त्याने लहान मुलांच्या टी शर्ट वर आपला ऑटोग्राफही दिला.

Leander Paes
Goa Assembly Election: लिएंडर पेसने गोव्यात जनसंपर्क मोहीमेेचा केला शुभारंभ!

लिएण्डर म्हणाला, देशासाठी खेळताना या देशातील लोकांनी मला भरभरून दिले. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. यासाठी राजकीय क्षेत्राएव्हढे दुसरे प्रभावी क्षेत्र नाही. मी त्याद्वारे बरेच काही करू शकेल असे मला वाटते. तृणमूल पक्षात का प्रवेश केला असे विचारले असता, तृणमुल हा एकच असा पक्ष आहे जो शास्त्रोक्त पद्धतीने राजकारण करतो. आणि या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी या केवळ फायटर नसून त्या जो शब्द देतात तो पाळणाऱ्या आहेत. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो तेव्हापासून दिदींना ओळखतो. मला विदेशात जाण्यासाठी प्रायोजक मिळत नव्हते त्यावेळी दीदींनीच मला मदतीचा हात दिला.

स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत बोलताना लिऍण्डर म्हणाला, मागचा महिनाभर मी गोव्यात आहे. त्यांच्या समस्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. मागच्या काही वर्षात माशांचे उत्पादन 80 टक्क्यांनी कमी झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यांना सवलतीच्या दरात उत्पादनाची साधने उपलब्ध करून देण्याची गरज त्याने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com