पणजी: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने सर्वच निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी भाऊगर्दी दिसून आली. अपक्ष तसेच सर्वपक्षीयांच्या उमेदवारांनी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 254 उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे 40 मतदारसंघासाठी एकूण 587 अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी उद्या 29 जानेवारी रोजी तर 31 रोजी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यामुळे त्याच निवडणूक (Election) रिंगणात राहिलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 21 जानेवारीला सुरू झाली होती. काही पक्षांची उमेदवारी नावे घोषित न झाल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थंडावली होती. 27 जानेवारीला मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी करताना 262 अर्जांची नोंद झाली होती. शेवटच्या दिवशी ही संख्या 254 वर गेली आहे.
ताकद पणाला
भाजपने (BJP) पहिल्यांदाच सर्व ठिकाणी उमेदवार दिलेत. काँग्रेस व गोवा फॉरवर्डने युतीमध्ये काँग्रेस 37 तर 3 जागांवर गोवा फॉरवर्ड निवडणूक लढवत आहेत. तृणमूल काँग्रेस व मगोची युती असून सर्व जागांवर उमेदवार दिलेत. आम आदमी पक्षानेही (AAP) स्वबळावर सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.