Goa Assembly: जमीन विक्रीवर ‘एसआयटी’ ची करडी नजर, 48 प्रकरणांत 49 जणांना अटक; मुख्यमंत्र्यांची माहिती

Chief Minister Pramod Sawant: जमीन विक्री प्रकरणी होणाऱ्या घोटाळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एसआयटी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्यात आली.
Goa Assembly: जमीन विक्रीवर ‘एसआयटी’ ची करडी नजर, 48 प्रकरणांत 49 जणांना अटक; मुख्यमंत्र्यांची माहिती
CM Pramod SawantS Social Media
Published on
Updated on

जमीन विक्री प्रकरणी होणाऱ्या घोटाळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एसआयटी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्यात आली. १५ ते २० वर्षांपासून सुरू असलेले कोणाची कोणाला जमीन विक्री करण्याच्या प्रकरणांवर बंदी आली. या प्रकरणी ४८ प्रकरणांत ४९ जणांना अटक केली असून त्यांच्यावर खटले दाखल केलेले आहेत. ‘नो मॅन लॅण्ड’ ९३ प्रकरणे आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

निवडणुकीचे काम हे त्याच काळात असते. केंद्र निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोग हे काम करीत असते. त्यांच्यासाठी बीएलओ उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यांची काही देय रक्कम आहे, ते लवकरच अदा केली जाईल. पोलिसांवर टीका करून अनेकजण बोलले, सर्व पोलिस दल अमलीपदार्थ व्यवहारावर लक्ष ठेवून आहेत. अमलीपदार्थाविषयी जेवढे आमदार बोलले आहेत, त्या प्रत्येकाची अमलीपदार्थ विरोध पथकाच्या पोलीस निरीक्षकास वैयक्तिक भेट घेण्यास सांगितले आहे, त्यांच्याकडे जी संशयीत आहेत, त्यांची नावे द्यावीत. आम्हाला मुलांमध्ये जागृती करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Goa Assembly: जमीन विक्रीवर ‘एसआयटी’ ची करडी नजर, 48 प्रकरणांत 49 जणांना अटक; मुख्यमंत्र्यांची माहिती
Goa Assembly: पावसाळ्यानंतर राज्यातील रस्त्यांवरील खड्डे एका महिन्यात बुजवणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गुन्ह्यांत घट झाल्याचे नमूद

करीत मुख्यमंत्री म्हणाले, गुन्ह्यांची संख्या २२.८३ टक्के कमी झाला,९० टक्के प्रकरणात तपास लागला आहे. १७२ किलो अमलीपदार्थ जप्त केला आहे. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवणे, पर्यटक फ्रेंडली, झिरो टॉलरन्स, भाडेकरूंची तपासणी अशी कामे गृहखाते करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com