CM Pramod Sawant: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; सावंत सरकार अयोध्येत उभारणार रामनिवास

Goa Assembly: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात बोलत असताना एक मोठी घोषणा केली.
गोवा सरकार आयोध्येत उभारणार रामनिवास; मुख्यमंत्री सावंत यांची मोठी घोषणा
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात बोलत असताना एक मोठी घोषणा केली. गोवा सरकार लवकरच अयोध्येत रामनिवास उभारणार आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री सावंत यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना पंढरपूरमध्ये गोवा सरकार भक्तनिवास उभारणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री सावंत यांनी केली होती. जागा उपलब्ध झाल्यानंतर गोवा सरकार त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भक्तनिवास बांधेल असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सर्व सामान्य लोकांना सुख शांती समृद्धी मिळू दे असे आपण विठुरायाला साकडे घातल्याचे सांगितले होते.

गोवा सरकार आयोध्येत उभारणार रामनिवास; मुख्यमंत्री सावंत यांची मोठी घोषणा
Goa Assembly: गोव्यात भात उत्पादनात 9462 मेट्रिक टनांनी वाढ, 'या' तीन तालुक्यातील उत्पादनात घट; कृषीमंत्र्यांची माहिती

मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर साकारल्यानंतर गोव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीरामांचे दर्शन सर्वप्रथम ज्यांना घ्यायचे आहे त्यांना आणि खास करुन कारसेवकांना पाठवण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाईल. त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था स्व:ता सरकारकडून करण्यात येईल, असे मडगावातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Olympians Development
Goa Seventh Budget 30000 Crore
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com