Goa Assembly Session: ‘आदिवासीबहुल' असा तिसरा जिल्हा व्हावा; सभापतींचे मत

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: केपे मुख्यालय ठेवून सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा तालुक्याचा मिळून हा जिल्हा वसावा असे मत व्यक्त केले आहे
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: केपे मुख्यालय ठेवून सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा तालुक्याचा मिळून हा जिल्हा वसावा असे मत व्यक्त केले आहे
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: आदिवासीबहुल असा तिसरा जिल्हा व्हावा, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले आहे. विकासासाठी केपे मुख्यालय ठेवून सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा तालुक्याचा मिळून हा जिल्हा वसावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, तिसरा जिल्हा हा विषय चर्चेत आहे. प्रत्येकाला याबाबत मत मांडण्याचा अधिकार आहे. आदिवासीबहुल असा हा आमचा भाग आजवर विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्या भागामध्ये विकासाला चालना देण्यासाठी तिसरा जिल्हा केपे येथे मुख्यालय ठेवून व्हावा, अशी आमची मागणी आहे.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: केपे मुख्यालय ठेवून सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा तालुक्याचा मिळून हा जिल्हा वसावा असे मत व्यक्त केले आहे
Goa Taxi Drivers: ...अन्यथा प्रवाशांना नाक्यावरच सोडणार; टॅक्सीचालक आक्रमक

दरम्यान, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्याला निनावी धमकी मिळाल्याची तक्रार दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

त्याविषयी पोलिसांनी संशयिताला शोधून काढल्यानंतर त्याच्याविरुद्धची कारवाई हक्कभंग समितीकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com