Goa Budget Session 2024: सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'जुमला'! विरोधी पक्षांची टीका

Goa Budget Session 2024 News in Marathi | आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उच्च मध्यमवर्गासाठी हा अर्थसंकल्प सरकारने सादर केल्याचे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) म्हटले आहे.
Goa Budget Session 2024 News: Goa Opposition Leader Slams Government Over It
Goa Budget Session 2024 News: Goa Opposition Leader Slams Government Over ItDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget Session 2024:

काल (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावरून गोव्यातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सामान्य जनतेच्या विरोधी हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Goa Budget Session 2024 News: Goa Opposition Leader Slams Government Over It
Goa Budget 2024 News: अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्यमवर्गीयांना आधार देणारा : श्रीनिवास धेंपे

हे तर 'निवडणूक भाषण' आहे. कारण अर्थमंत्री परदेशी गुंतवणुकीबद्दल बोलल्या परंतु अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरतीवर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही, अशी बोचरी टीका आपने केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उच्च मध्यमवर्गासाठी हा अर्थसंकल्प सरकारने सादर केल्याचे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) म्हटले आहे.

कॉंग्रेसतर्फेही सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात 18 लाख कोटी रुपयांची तूट असून ही अतिशय चिंताजनक बाब आहे. यावरून हे सिद्ध होते की सरकार आपल्या खर्चासाठी कर्ज घेत आहे आणि महसूल निर्मितीसाठी सरकारतर्फे काहीही केले जात नाही, असे काँग्रेस मीडिया सेलचे प्रभारी अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दरम्यान, आजपासून आजपासून गोवा विधानसभेचे अर्सनकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारला घेराव घालण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज असून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येणार असल्याचे, विजय सरदेसाई म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com