पणजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ हा मध्यमवर्गीय आणि गरीब, तरुण, महिला आणि करदाते यांना आधार देणारा आहे.
या अर्थसंकल्पातून गोव्याला पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो, असे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.
गुरुवारी (ता.१) सकाळी जीसीसीआयने त्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अंतरिम बजेट २०२४-२५चे थेट प्रक्षेपण ठेवले होते. अर्थसंकल्पाचे प्रसारण उद्योगपती श्रीनिवास धेंपे आणि गोव्यातील व्यावसायिक वर्तुळातील इतर प्रमुख व्यक्तींनी पाहिले.
या अंतरिम अर्थसंकल्पाच्या थेट प्रक्षेपणानंतर, जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे म्हणाले की, ‘अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ पाहून मला आनंद होत आहे की लोकांवर कराचा कोणताही अतिरिक्त बोजा लादला गेला नाही आणि पूर्वीच्या गोष्टी पुढे नेल्या गेल्या आहेत.
अर्थसंकल्पात लोकांचे उत्थान आणि कौशल्य, शेतकऱ्यांना कर्ज, चांगली स्टार्ट अप परिस्थिती, महिलांसाठी उत्तम साहाय्यक योजना, उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नारी शक्ती सुधारणा यावर भर दिला आहे.
धेंपे म्हणाले की, या अर्थसंकल्पातून गोव्याला पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय या दोन क्षेत्रांमध्ये फायदा होईल. आध्यात्मिक पर्यटन आणि अंतर्गामी पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. विशेष अनुदान आणि पर्यटन फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी कर्ज या गोष्टी चांगल्या आहेत.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी गोव्याला मासेमारी समुदायातील मत्स्य संपदा योजना आणि विविध माध्यमातून फायदा होऊ शकतो असे सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.