Goa Assembly Budget Session 2024: कसा असेल गोव्याचा अर्थसंकल्प? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात...

Goa Assembly Budget Session 2024: यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असेल - डॉ. सावंत
Goa Assembly Budget Session 2024
Goa Assembly Budget Session 2024Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Assembly Budget Session 2024: गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिलीय. सकाळी 11.30 वाजता अधिवेशन बोलावण्यात येणार असून 2024 वर्षामधील हे पहिलेच अधिवेशन आहे.

या बजेट सेशनसाठी संबंधी बोलताना सावंत म्हणाले, 'अर्थसंकल्पाच्या भविष्यातील नियोजनासाठी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांसोबत बैठक घेतली असून प्रत्येक विभागाकडून सूचना घेण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या राज्यासाठी असणाऱ्या योजना तसेच केंद्राकडून कुठल्या प्रकल्पांना प्रकल्प मान्यता देण्यात आली आहे यासंबंधीची चर्चा आज झाली आहे.

या अर्थसंकल्पासाठी जनतेकडूनही आम्ही सूचना मागवल्या असून राज्यातील सर्व उद्योग संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरी क्लब आणि अशा सर्व संस्थांकडून आम्ही सूचना घेत आहोत.

यंदाही राज्यासाठी चांगला अर्थसंकल्प मांडणार असून त्यादृष्टीने आम्ही तयारी सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बरेच गाजले होते. सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून खाण लिलाव, वाढती बेरोजगारी यासारख्या अन्य विषयांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant MGP Political Limits
Goa Surla Farmers Compensation
Goa Assembly three day session
Goa Olympians Development
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com