Goa Asgaon: भोवळ येत असल्याचे सांगत प्रिंशाचे पलायन

Asgaon House Demolition Case: सहा कोटींचा व्यवहार झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही; प्रिंशा आगरवाडेकर
Asgaon House Demolition Case: सहा कोटींचा व्यवहार झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही; प्रिंशा आगरवाडेकर
Goa House Demolition CaseDainik Gomantak

संबंध गोवा खवळून निघालेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणात स्थानिक आमदार दिलायला लोबो, सरपंच हनुमंत नाईक, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, इतकेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचबरोबर विरोधी पक्षाचे नेते, अनेक सामाजिक संस्था यांनीही घटनास्थळी भेट देत आगरवाडेकर कुटुंबीयांना पाठिंबा दर्शविला होता, परंतु आगरवाडेकर कुटुंबीयांनी एका रात्रीत घुमजाव करीत तमाम गोमंतकीयांचा अपमान केल्याची भावना सध्या निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या स्थानिक प्रतिनिधींनी आगरवाडेकर कुटुंबीयांसमवेत त्यांचे वकील ॲड. प्रसाद देसाई यांना समाज व कायद्याशी प्रतारणा केल्याबद्दल फैलावर घेतले. शेवटी आपल्याला भोवळ येते असल्याचे सांगत प्रिंशा आगरवाडेकर यांनी तेथून पळ काढला.

पूजा शर्मा या एका मुलाच्या आई आहेत. जो प्रकार घडला त्याच्याशी त्यांचा कुठलाच थेट संबंध नसल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनीकडून आम्हाला कळले. त्यांनी नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानेच आपण त्यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Asgaon House Demolition Case: सहा कोटींचा व्यवहार झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही; प्रिंशा आगरवाडेकर
Asgaon Goa: पूजा शर्मा यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही; आगरवाडेकरांच्या वकिलांकडून पाठराखण

या बदल्यात कुठल्याही पैशांच्या व्यवहाराची बोलणी झालेली नसून स्थानिक प्रसार माध्यमांकडूनच अशी हवा निर्माण करण्यात आली आहे. या प्रकरणात सहा कोटींचा व्यवहार झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे प्रिंशा आगरवाडेकर म्हणाल्या.

आसगावात झालेल्या प्रकाराची दखल घेत सरकारकडून आगरवाडेकर कुटुंबीयांना पाडलेले घर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु पूजा शर्मा यांच्यावतीनेही आगरवाडेकर कुटुंबीयांना नवीन घर बांधून देण्याचा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला दोन्हींकडील मदत घ्यायची नाही, असे ॲड. प्रसाद देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com