Artificial Intelligence तंत्रज्ञान अपरिहार्यच! मात्र आर्थिक दरी निर्माण न होण्याचे आव्हान- डॉ. काकोडकर

गेल्यावर्षी मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार विज्ञान सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती.
Artificial Intelligence
Artificial IntelligenceDainik Gomantak
Published on
Updated on

Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा तंत्रज्ञान अपरिहार्य असून त्याला आता नाही म्हणता येणार नाही. त्यातून समाजात आर्थिक दरी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने दृकश्राव्य माध्यमांद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

काकोडकर म्हणाले, औद्योगिक क्रांतीनंतर बेरोजगारी वाढेल, असे भाकीत वर्तवले जात होते. काहीअंशी ते खरे ठरले असले तरी तंत्रज्ञानामुळे आर्थिक उलाढालींत वाढ होते आणि त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. रोजगार मिळण्याचे स्वरूप बदलते. त्यानुसार कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

Artificial Intelligence
Goa Medical College : ‘गोमेकॉ’ पदव्युत्तर प्रवेश आरक्षणानुसारच!

देशभरातील संशोधक या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. त्यापैकी काहीजणांना गुणवत्तेवर डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

गेल्यावर्षी पर्रीकर विज्ञान महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विज्ञान तंत्रज्ञान खात्याने हा पुरस्कार देणे यंदापासून सुरू केले आहे.

यावेळी निवड समितीचे सदस्य माजी कुलगुरू डॉ. सतीश शेटये आणि माजी सनदी अधिकारी ॲंथनी डिसा उपस्थित होते.

Artificial Intelligence
Mazi Bus Scheme मुळे वाहतूक सेवेत आमूलाग्र सुधारणा होणार- माविन गुदिन्हो

युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी आवाहन

संशोधन क्षेत्रासाठी असलेल्या शांतीस्वरूप भाटनागर या राष्ट्रीय पुरस्काराइतकीच पाच लाख रुपयांची बक्षीस रक्कम असणाऱ्या मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२३ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी पत्रकार परिषदेतच याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की गेल्यावर्षी ३१ डिसेंबर रोजी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेले संशोधक या पुरस्कारासाठी पात्र आहेत.

पाच लाख रुपये व मानपत्र, असे या पुरस्कारचे स्वरूप असून १३ डिसेंबर या पर्रीकर यांच्या जयंतीदिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com