Mazi Bus Scheme मुळे वाहतूक सेवेत आमूलाग्र सुधारणा होणार- माविन गुदिन्हो

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो: कदंब बसस्थानकांचे केंद्र सरकारच्या मदतीने होणार नूतनीकरण
Mazi Bus Scheme Inauguration
Mazi Bus Scheme InaugurationDainik Gomantak
Published on
Updated on

Mazi Bus Scheme Inauguration गोवा सरकारची ‘माझी बस’ योजना आजपासून सुरू झाली. मडगावच्या कदंब बसस्थानकावर २५ खासगी बसगाड्यांना आज या योजनेत सामावून घेण्यात आले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी बसचे पूजन करून व हिरवा बावटा दाखवून या योजनेला प्रारंभ केला. या योजनेमुळे गोव्यातील प्रवासी वाहतूक सेवेत आमूलाग्र सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कदंब बस परिवहन महामंडळाचे चेअरमन आमदार उल्हास तुयेकर, आमदार दिगंबर कामत, बसमालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर उपस्थित होते.

राज्यातील १८७ बसमालकांनी या योजनेत नोंदणी केली आहे. मडगावातून एकूण ६६ बसगाड्या या योजनेंतर्गत फोंडा, काणकोण व इतर मार्गावर चालणार आहेत. पणजी शहरातही येत्या दोन आठवड्यात ४८ बसगाड्या या योजनेत सामील होतील, असे वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल म्हणाले, गोवा हे पर्यटन केंद्र असल्याने वाहतूक सेवा सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण वाहतूक खात्याला ॲप तयार करण्याची शिफारस केली आहे.

Mazi Bus Scheme Inauguration
IPHB: ‘त्‍या’ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका पाहण्याचा नागरिकांना हक्क!

आमदार दिगंबर कामत म्हणाले, की गोव्यात कदंबची सेवा कमी पडते. या योजनेमुळे प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल. सुदीप ताम्हणकर यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत सरकारने न दिलेल्या इंधन अनुदानाची मागणी केली.

इंधन अनुदान न मिळाल्याने सुमारे ६०० बसगाड्या बंद आहेत. उल्हास तुयेकर यांनी सांगितले की, या योजनेमुळे कदंबवरील भार कमी होईल. यावेळी ‘माझी बस’ योजनेची माहिती संजय घाटे यांनी दिली.

Mazi Bus Scheme Inauguration
Wage Of Workers: आमदारांचा पगार वाढवला, कामगारांचा कधी? संतप्त कामगार नेत्यांनी दिलाय 'हा' इशारा

‘माझी बस’ योजनेची वैशिष्ट्ये

  • सहा महिन्यांसाठी ही पथदर्शक योजना आहे. खासगी मालकांच्या ज्या बसगाड्या बंद आहेत, त्या परत रस्त्यावर आणणे. यातून रोजगार निर्माण करणे व गोव्यात प्रवासी बस वाहतुकीत सुधारणा करणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे.

  • सहा महिन्यानंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल. काही त्रुटी असतील, तर त्या सुधारल्या जातील व नंतर ‘माझी बस’ची पक्की योजना तयार केली जाईल.

  • सध्या या योजनेखाली खासगी बसमालकांना प्रती किलोमीटरमागे ३४ रुपये दिले जातील. बसची दुरुस्ती, देखभाल, इंधनाची व्यवस्था मालकाला करावी लागेल.

  • कदंबने जो महसूल प्राप्ती व खर्चाचा हिशोब मांडला आहे, त्यानुसार कदंबला प्रति किलोमीटर ३० रुपये महसूल प्राप्त होईल. खर्च मात्र ३४ रुपये. त्यामुळे कदंबला प्रती किलोमीटर ४ रुपयांचा भार सोसावा लागेल.

  • सरकारने या योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील ४.५ कोटी रुपये सरकारतर्फे कदंबला देण्यात आले आहेत.

Mazi Bus Scheme Inauguration
Most Polluted City in Goa: राजधानी पणजी गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर! राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा करार

मडगावच्या कदंब बसस्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. आपण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणी केली असून सर्व खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारमध्ये ३० वर्षांचा करार होणार आहे.

३० वर्षांनंतर बसस्थानकाची मालकी राज्य सरकारची होईल. सध्या ९७ लाख रुपये खर्च करून कदंब बसस्थानकातील रस्ते, पथदीप, प्रवाशांसाठीच्या शेडची दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com