

उत्तर गोव्यातील हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. क्लबमध्ये प्रचंड गर्दी होती आणि बाहेर पडण्याचे दरवाजे अतिशय लहान असल्याने अनेक जण आतमध्येच अडकले. याशिवाय, सिलिंडर स्फोट आणि बांधकामात ज्वलनशील साहित्याचा वापर ही आग भयानक होण्याची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेपूर्वी काही क्षणांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये छतावरून ठिणग्या आणि ज्वाळा पडताना स्पष्टपणे दिसत आहेत. हा आगीचा प्रसार हळूहळू संपूर्ण परिसरात पसरत गेला. त्यानंतर अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यातूनच मोठ्या आगीला तोंड फुटले.
रात्री उशिरा घडलेल्या या भीषण घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हडफडे येथील या नाईट क्लबमधील उत्सव काही क्षणांतच भयानक दुर्घटनेत रूपांतरित झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे अनेकांचा श्वास कोंडून मृत्यू झाला, तर काही जण आगीत अडकून भाजले.
हैदराबादमधील पर्यटक फातिमा शेख यांनी सांगितले की, प्रेक्षक पळून जाण्यासाठी खाली स्वयंपाकघरात पळाले, जिथे ते कर्मचाऱ्यांसह अडकले.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आग पहिल्या मजल्यावर लागली होती, जिथे गर्दीचा परिसर आणि लहान दरवाजे असल्याने लोक अडकले होते.
एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.
या क्लबला बेकायदेशीरीत्या परवाने दिलेल्या एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.