Arambol Panchayat: हरमल पंचायतीतील 'त्या' घटनेमागे 'गॉडफादर'? सावळ्या गोंधळामुळे नागरिकांची मात्र गैरसोय

हरमलमध्ये संगीत खुर्ची ः आठ महिन्यांत आठ सचिव!
Arambol Panchayat
Arambol PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Arambol Panchayat हरमल पंचायत ‘श्रीमंत’ मानली जाते, मात्र या पंचायतीत ‘सचिव’पद स्थिर नाही. गेल्या आठ महिन्यात आठ सचिव बदलले गेले. पंचायत इतकी गब्बर असूनही ''सचिव'' टिकत नाही, यांचे आश्चर्य आहे. सचिवांची वारंवार बदली होण्यास ‘उच्च पदस्थ किंवा गॉडफादर’ या सावळ्या गोंधळात जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

हरमलचे पंच गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असून कित्येक समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा विचार आहे. पण वारंवार होणाऱ्या सचिवाच्या बदलीमुळे विकासकामांत खंड पडत आहे.

ग्रामस्थांच्या सहकार्याने सचिवांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन, मोर्चा वा उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्याची पाळी येऊ नये, असे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी सांगितले.

Arambol Panchayat
Mhadai Forest: म्हादई परिसर बहरतोय, वैशाख 'वणव्या'नंतर लाभली नवसंजीवनी

गेल्या आठ महिन्यात आठ पंचायत सचिव आले, त्यातील दोन जणांनी परस्पर ''गॉडफादर''कडून बदलीचकरून घेतली. सर्वात कमी काळाचा सचिव म्हणून कांबळी यांची परवाच बदली झाली.

पंचायत कार्यालयातील स्थिती वाईट आहे. कारण ना हरकत दाखला, घरपट्टी, उत्पन्न दाखला, ओबीसीसाठी आवश्यक दाखले मिळण्यासाठी सचिवांची गरज भासते. ते नसल्यामुळे कोणताही ही दाखला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी सचिवांच्या ‘संगीत खुर्ची’चा प्रकार त्वरित थांबवण्याची गरज असून गटविकास व उच्च पदस्थांनाही याबाबत विचारले पाहिजे.

कारण ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे खूपच अडचण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन आमदारांनी लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थाची मागणी आहे.

Arambol Panchayat
Viral infection: गोवेकर हैराण! सर्दी-तापासह ‘डोळे येण्या’ची साथ

27 रोजी ग्रामसभेत चर्चा होणार

27 तारखेला ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. गटविकासकडून येणारा सचिव ग्रामसभा घेईल, मात्र ग्रामस्थांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे ते देऊ शकणार का? असा सवाल आहे.

अलीकडच्या ग्रामसभा म्हणजे लोकशाहीची थट्टा असून किरकोळ नागरिकांच्या अल्प उपस्थितीत राहतात. त्यामुळे २७ रोजी सचिवाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com