Goa: भाजपच्या युवा मोर्चाच्या नवीन समितीची घोषणा

आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत निवड समितीची घोषणा (Goa)
New committee of BJP Youth Front, Panaji Goa
New committee of BJP Youth Front, Panaji GoaDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपच्या युवा मोर्चाच्या (BJP Youth Front) नवीन समितीची आज घोषणा करण्यात आली. यावेळी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात (MLA Babush Monserrate) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या समितीत 39 जणांचा समावेश आहे. यामध्ये एक अध्यक्ष, 4 उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस तीन सचिव, एक आयटी विभाग प्रमुख आणि इतर सर्व सदस्य अशा पदांचा समावेश आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी (BJP Youth Front President) मांगिरिश उसगावकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निशिकांत राऊत-देसाई, मनोज उर्फ निखिल गडेकर, सिद्धनाथ बोरकर आणि साईश नाईक यांची निवड झाली आहे. सरचिटणीपदी पारस गावस्कर आणि आदिश पै आंगले यांची निवड झाली आहे. सचिवपदी भालचंद्र पेडणेकर, अभिषेक दळवी आाणि रिचर्ड बाप्तिस्त यांची निवड झाली असून आयटी विभागाच्या प्रमुखपदी स्वेतांग नाडकर्णी यांची निवड करण्यात आली. (Goa)

New committee of BJP Youth Front, Panaji Goa
Goa Crime: पेडणे येथे लॅपटॉप प्रकरणी एकाला अटक

युवा मोर्चाच्या नवीन समितीत सदस्य म्हणून ज्ञानेश्‍वर पालव, हर्ष जोशी, प्रणिता तळकर, प्रभेश वळवईकर, प्रणिता नाईक, राकेश सोळंकी, रितेश नाईक, अमोद वाडकर, रिषभ नाईक, सूरज नाईक, लक्ष्मण साळकर, प्रतिक गावस, अनिश पै, विराज वस्त, प्रणिता नास्नोडकर, राहुल पाडलोस्कर, अनिश माईणकर, साईजीत कुडतरकर, साईश पेडणेकर, सोहाली चोडणकर, हर्ष माशेलकर, दिशान नाईक, मिहिर कुंडईकर, गांधार आमोणकर, रुद्रन वागळे, शुभागण शेट्ये, चैतन्य कुंकळ्येकर आणि मयूर धोंड हे काम पाहतील. आमदार बाबूश मोन्सेरोत यांनी सर्व युवकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेद्वार भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com