केरी - सत्तरीतील अंजुणे धरणाच्या (Anjunem Dam at Keri - Sattari) जलाशयाची पातळी आज 86.91 मीटर झाली आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात ही पातळी 89 मीटरवर येईल. एकदा ही पातळी 89.60 मीटर झाल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे जलसंधारण खात्याच्या (Water Conservation dept.) कार्यकारी अभियंत्याने सांगितले आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कयटी( Costi river) नदीतून सोडण्यात येईल. ते पाणी पुढे वाळवंटी नदीला (Valvonti river) मिळणार आहे. तेव्हा या दोन्ही नद्यांशेजारील नागरिकांनी यासंबंधी काळजी घ्यावी. तसेच नदी पात्रात कपडे धुणे, गुरांना नेणे किंवा नदी पार करताना दक्षता घ्यावी असे जलसंधारण खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.आज त्यांनी या संबंधीचे परीपत्रक केरी (Kerim), मोर्ले (Morlem), पर्ये (Poriem), कारपूर-सर्वाण(Karapur - Sarvan) या सर्व ग्रामपंचायतींना तसेच साखळी (Sankhalim) नगरपालिकेला पाठवण्यात आले आहे. तसेच इतर संबंधित खात्याला पत्राव्दारे कळवण्यात आले आहे.
अंजुणे धरणाची सर्वोच्च क्षमता पातळी ही 93.2 मीटर असून सद्यस्थितीत परिसथितीचा विचार करता सुरक्षतेच्या कारणास्तव ही पातळी 89.6 मीटर पर्यंत राखली जाईल असे खात्याच्या अभियंत्याने सांगितले. पण जर का एकदा धरणाने 89.6 मीटर ची पातळी गाठली तर धरणात अतिरिक्त जमा झालेले पाणी ओहोटीच्या वेळी धरणातून सोडले जाईल असे त्यांनी सांगितले. सध्या गोव्यातील (Goa) सर्वच भागात जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वच घराणे वेगाने भरू लागली आहेत. त्यामुळे सदर भागात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.