Anjuna Night Clubs: हायकोर्टाचा आदेश धाब्यावर : नाईट पार्ट्या सकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच

Anjuna Night Clubs: पोलिस निष्क्रिय : कर्कश संगीतामुळे स्थानिकांची उडाली झोप
Anjuna Night Clubs
Anjuna Night ClubsDainik Gomantak

Anjuna Night Clubs: उच्च न्यायालयाने आदेश देऊनही हणजुणे व किनारपट्टीवरील बहुतांश भागांमध्ये नाईट पार्ट्यांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग आरंभला असून या पार्ट्या उघड्यावर गेला आठवडाभर सुरू आहेत.

''काही पार्ट्या या भागांमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असून त्यांना आडकाठी करायला गेलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला’’, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

हणजुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केले असून स्थानिकांच्या झोपेचे अक्षरश: खोबरे झाले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक देतात.

पोलिसांच्या या प्रवृत्तीमुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कडक आदेश दिलेल्या न्यायालयांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोचला आहे. स्थानिक नागरिक म्हणाले की, हणजुणे परिसरात बहुतेक नाईट क्लबनी उघड्यावर पार्ट्या आयोजित केल्या असून कानाचे पडदे फाडू शकणाऱ्या कर्कश संगीताचे प्रतिध्वनी कित्येक मैल ऐकू येतात. हे प्रदूषण पोलिसांनाच कसे ऐकू येत नाही?

  • डोंगरांवरही धुडगूस
    हडफडे येथील डोंगरावर सध्या विशेष पार्ट्या सुरू झाल्या आहेत. नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पार्ट्यांचा हा धुडगूस अद्याप सुरूच आहे. टॉय मैदानावरही पार्ट्या सुरू झाल्या आहेत. स्थानिकांचा त्यांना विरोध आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, त्यांनी यासंदर्भात पोलिस, पर्यावरण खाते व उत्तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवूनही हे प्रकार थांबलेले नाहीत.

  • अधिकाऱ्यांनी ठेवले कानावर हात!
    पोलिस अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किनारी भागात ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा इन्कार केला.

    हणजुणे पोलिस म्हणाले की, आमचे अधीक्षक व ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळी प्रत्यक्ष फिरत असून परिस्थितीवर त्यांचे लक्ष आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी म्हणाले की, पावणे दहा वाजता आम्ही प्रत्यक्ष पार्ट्या सुरू आहेत, तेथे जाऊन 10 वाजता संगीत बंद होईल, याची खबरदारी घेतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com