Illegal Construction: गोवा हणजूण किनारपट्टी परिसरातील 'NDZ'मधील 26 बांधकामे पाडली बंद

Illegal Construction: बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्‍यात येणार आहेत.
Illegal Construction
Illegal ConstructionDainik Gomantak

Illegal Construction: हणजूण किनारपट्टी परिसरातील ‘ना विकास क्षेत्र’ (एनडीझेड) व सीआरझेड उल्लंघन केलेली सुमारे 275 बांधकामे असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यापैकी प्रथमदर्शनी 26 बांधकामे बेकायदा असल्याने त्यांना बांधकाम तसेच व्यवसाय बंद करण्याचा आदेश हणजूण पंचायतीने काढला आहे. उर्वरित व्यावसायिकांना तसेच बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्‍यात येणार आहेत.

दरम्यान, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी काल खंडपीठाने म्हापसा गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली (बीडीओ) हणजूण पोलिस निरीक्षक, हणजूण सरपंच व सचिवांची चारसदस्यीय समिती स्थापन केली. अंमलीबजावणीस हलगर्जीपणा झाल्यास या समितीला जबाबदार धरले जाईल असे संकेतही खंडपीठाने दिले आहेत.

मागील सुनावणीवेळी हणजूण पंचायत क्षेत्रात बेकादा सुमारे 275 बांधकामे व व्यवसाय सुरू असल्याचा अहवाल गोवा खंडपीठाला सादर केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या बेकायदा बांधकामाबाबत हणजूण पंचायतीकडून कोणतीच पावले उचलण्यात न आल्याने गोवा खंडपीठाने आश्‍चर्य व्यक्त केले होते.

Illegal Construction
Goa Petrol-Diesel Price : उत्तर गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या आजचे दर

तसेच, या बेकायदा बांधकामांविरुद्ध कोणती तसेच किती वेळेत कारवाई केली जाईल, याची माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने पंचायतीला दिला होता. त्यानुसार आज पंचयतीने माहिती देताना 26 बांधकामे व व्यवसाय बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. उर्वरितांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडे असलेल्या परवान्यांची पडताळणी केली जाईल.

त्यात ज्यांनी उल्लंघन केले आहे, तसेच एनडीझेड क्षेत्रात आहेत त्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे खंडपीठाला सांगितले. पुढील सुनावणी 16 जानेवारी 2023 ला ठेवली आहे. त्यावेळी पंचायतीने केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com