"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Goa Animal Liberation Movement: तिथल्या सादरीकरणात उलट भूमिका (रिव्हर्स रोल-प्ले) साकारल्या जात होत्या. माणसांना पिंजऱ्यात व साखळ्यांनी बांधलेले दाखवले गेले होते तर प्राणी बाहेर मोकळे उभे होते.
Goa Animal Liberation Movement
Goa Animal Liberation MovementDainik Gomantak
Published on
Updated on

तिथल्या सादरीकरणात उलट भूमिका (रिव्हर्स रोल-प्ले) साकारल्या जात होत्या. माणसांना पिंजऱ्यात व साखळ्यांनी बांधलेले दाखवले गेले होते तर प्राणी बाहेर मोकळे उभे होते. या प्रतीकात्मक कृतीद्वारे प्राण्यांचे शोषण होणार्‍या वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटच्या वतीने २७ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पाटो, पणजी येथे चौथा वार्षिक ''प्राणी मुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आला होता. वरील ‘रिव्हर्स रोल-प्ले’ हा या मोर्चाचा भाग होता. या शांततामय सार्वजनिक आंदोलनात गोव्यासह इतर भागांतील कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. या मोर्चाद्वारे प्राण्यांच्या मुक्ततेसाठी तसेच प्राण्यांसाठी नैतिक न्यायाची मागणी करण्यात आली.

१९ डिसेंबर रोजी साजऱ्या झालेल्या गोवा मुक्तिदिनानंतरच्या या कार्यक्रमामुळे ‘मुक्ती’ ही एक सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे’ हा विचार प्रकट होत होता. गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटच्या आयोजकांचे म्हणणे होते, ‘गोव्याच्या मुक्तीला आकार देणारी मानवी प्रतिष्ठा, शोषणाविरोधातील लढा आणि न्याय ही तत्त्वे प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच लागू आहेत.’

गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंट ही जगभरातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या अ‍ॅनिमल लिबरेशन मोर्चांचा वाढत्या जागतिक नेटवर्कचा भाग आहे. या चळवळीचा समान उद्देश म्हणजे प्राण्यांसाठी न्यायाची मागणी. गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटच्या गोवा शाखेचे प्रतिनिधित्व जेमिनी शेट्टीगर, जोआन फर्नांडिस, त्रिशा बेणे, डॅनियल थॉमस आणि फ्लर कुलासो करतात.

आयोजक जेमिनी शेट्टीगर म्हणाल्या, “मी मांसाहारी म्हणून वाढले. मात्र ‘अर्थलिंग्स’ हा माहितीपट आणि इतर व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या निवडींमुळे प्राण्यांना किती यातना सहन कराव्या लागतात हे लक्षात आले आणि मी व्हेगन झाले.

व्हेगन असणे म्हणजे शक्य तितक्या प्रमाणात आपल्या कृतींमुळे कोणत्याही कारणासाठी प्राण्यांचे शोषण किंवा नुकसान होऊ नये याची खात्री करणे. मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ/दूध व मध न खाण्याबरोबरच लेदर, लोकर, रेशीम, फर, मोती, प्राणीसंग्रहालये, प्राणी सर्कस, प्राण्यांवर चाचणी केलेली उत्पादने यांनाही टाळणे यात समाविष्ट आहे. प्राण्यांनाही आमच्यासारखीच स्वातंत्र्याची इच्छा आणि हक्क आहेत; त्यामुळे त्यांचा वापर म्हणजे निव्वळ शोषण आहे.”

फ्लर कुलासो म्हणाल्या, “लैंगिक भेदभाव, जातीयता आणि ट्रान्सफोबिया यांसारख्या अन्यायांविरोधात मी आधीच भूमिका घेतली होती. मात्र नंतर लक्षात आले की ‘स्पिशिझम’ म्हणजेच केवळ ते अमानवी प्रजातीतील आहेत म्हणून संवेदनशील जीवांचे शोषण करणारा भेदभाव. यालाही आपण नाकारले पाहिजे आणि त्याविरुद्ध लढले पाहिजे.

Goa Animal Liberation Movement
Chimbel Protest: '..आमचो गळो चिरलो'! युनिटी मॉलविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक; आंदोलक बसले उपोषणाला Video

जोआन फर्नांडिस यांच्या मते, “प्राणी आपल्यासारखे बोलत नाहीत किंवा विचार करत नाहीत, हे येथे महत्त्वाचे नाही. नैतिकदृष्ट्या महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना वेदना जाणवतात. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाहीत अशा निवडी करणे ही आपली जबाबदारी आहे.” या मोर्चामध्ये ''प्रजातीवाद'' ( स्पिशिझम) माणसे इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत हा समज. या मुद्द्यावरही भर देण्यात आला. न्याय, सहानुभूती आणि अहिंसेवर आधारित समाज घडवण्यासाठी स्पिशिझमचा नकार आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Goa Animal Liberation Movement
Shopping Tips: व्हेगन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताय लक्षात ठेवा 'या' गोष्टी

‘व्हेगनवाद’ हा आहार नव्हे चळवळ : अन्नप्रणाली, संशोधन, मनोरंजन, फॅशन आणि सांस्कृतिक प्रथा यामध्ये आजही प्राण्यांना वस्तूसारखे वापरले जाते. ‘व्हेगनवाद’ हा केवळ आहाराचा पर्याय नसून ती एक सामाजिक न्याय चळवळ आहे. ही चळवळ प्राण्यांना मालमत्ता समजून वागवण्याला आव्हान देते. शक्य तिथे आणि व्यवहार्य पातळीवर प्राण्यांचा वापर थांबवणे, तसेच हिंसक व्यवस्थेऐवजी करुणा व जबाबदारीवर आधारित पर्याय स्वीकारणे, हे व्हेगनवादाचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com