अंगणवाडी सेविकांचा आरोग्य केंद्रात जाण्यास नकार

प्रकृती बिघडली : उपोषणाला संघटनांचा पाठिंबा लागला मिळू
Anganwadi workers
Anganwadi workersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी; सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याच्या आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गेल्या चाळीस दिवसांपासून आझाद मैदानावर बसलेल्या अंगणवाडी सेविकांची प्रकृती खालावली आहे. पाऊस, वारा आणि उपोषणामुळे त्या आजारी पडल्या. परंतु त्यांनी उपाचारासाठी आरोग्य केंद्रात जाण्यास नकार दिला आहे. (Goa Anganwadi workers refuse to go to health center )

मुख्यमंत्री या प्रकरणात राजकारण करीत असल्याची शुक्रवारी गोवा रिपब्लिकन पक्षाने या सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांना न्याय मिळावा यासाठी पक्षातर्फे राज्यपाल व आमदारांना निवेदन देऊन मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे अमित कोरगावकर, माला राठोड, रेखा लोहार, तुळशीदास परवार आदींची उपस्थिती होती.

Anganwadi workers
गोव्यातील 1,461 चौरस कि.मी. क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आंदोलन केले होते. आझाद मैदानावर सुरू झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा शेवट मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर गेल्यानंतर मध्यरात्री झाला होता. परंतु या आंदोलनानंतर सात अंगणवाडी सेविकांना कामावरून काढून टाकण्यात आले.

Anganwadi workers
गोवा सरकारकडून शिंजो आबेंना श्रध्दांजली, एक दिवसाचा दुखवटा जाहीर

त्यांना काढून टाकण्याचा आदेश महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक यांनी 1 एप्रिल 2022 रोजी काढला होता. त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षापासून अंगणवाडी सेविकांनी आम्हाला सेवेत दाखल करून घ्यावे म्हणून मागणी केली. परंतु त्यावर सरकारने नकार दिल्याने या सेविकांनी बेमुदत उपोषणास सुरवात केली.

सेविकांकडून पाण्याचाही त्याग

अंगणवाडी सेविकांच्या उपोषणाचा शुक्रवारी ४४ वा दिवस होता. मागील काही दिवसांत या महिलांचे आरोग्य बिघडले होते, त्यांच्यावर उपचारही झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हमीपत्रात घातलेल्या त्यांनी मान्य करण्यास नकार दिला. त्याचबरोबर आझाद मैदानावरून न हटण्याचा निर्धारही केला. या सेविकांनी पाण्याचाही त्याग केला असून, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Hydrogen Fishing Trawlers Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com