अंमलबजावणी संचालनालयाचे आप गोवा संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना समन्स. गुरुवारी (28 मार्च) ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश.
Panaji Smart City
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाची स्वत: पाहणी करणार. स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या प्रदुषणाविरोधात पणजीतील जागृत नागरिकांनी उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या आहेत.
सांगोल्डा पंचायतीत 16.10 लाखांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने उपसरपंच उल्हास मोरजकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पंचायत संचालनालयाने त्यांना उपसरपंच पदावरून हटवण्याचा आदेश दिला आहे.
Benaulim Murder Case
बाणावली येथे विश्वनाथ सिधनल यांच्या हत्येप्रकरणी पत्नी वैष्णवी सिधनलला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, अधिक तपास सुरु आहे.
एका दीड महिन्याच्या बालिकेला तिच्याच आईने उघड्यावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रियांका फर्नांडिस (३०, चंदगड-महाराष्ट्र) हिला अटक केली आहे. या महिलेने स्वत:च्याच मुलीला असे उघड्यावर का टाकून दिले याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
भाजपच्या लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांचे वास्को येथे महिलांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
Assolda Quepem
कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या चार बैलांची सुटका. असोल्डा, केपे येथे स्थानिकांनी वाहन रोखल्यानंतर पोलिसांची कारवाई. मोहम्मद सादिक आणि लियाखत बेपारी (चांदर) यांना पोलिसांकडून अटक, वाहनही ताब्यात. पुढील तपास सुरू आहे.
Goa Para Athlete
गोव्याची पॅरा अॅथलीट साक्षी काळे हिने सहाव्या भारतीय खुल्या पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णासह एकूण तीन पदके जिंकली.
स्पर्धा बंगळूरमधील श्री कांतीरवा स्टेडियम संकुलात झाली. तिने टी-१२ (अंधत्व) प्रकारात लांबउडीत सुवर्ण, १०० मीटर शर्यतीत रौप्य, तर २०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.
Panaji Muncipal Corporation
महानरपालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी गटाच्या ११ महिला नगरसेवक आहेत. परंतु त्यांना महापौरपद किंवा उपमहापौरपद देण्यात भाजपला स्वारस्य वाटत नाही. एका बाजूला लोकसभेची दक्षिणेत महिला उमेदवार देऊन भाजपकडून ५० टक्के आरक्षण दिल्याचा ढोल वाजवला जात आहे.
परंतु महानगरपालिकेत १२ महिला नगरसेवक आहेत. त्यापैकी ११ महिला नगरसेवक सत्ताधारी गटाच्या आहेत. या महिलांमध्ये एकही महिला महापौरपदासाठी पात्र नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Borda fatorda
बोर्डा-फातोर्डा येथे आढळले प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले दीड महिन्याचे बाळ. चौकशीसाठी बाळाच्या पालक पोलिसांच्या ताब्यात. वैद्यकीय तपासणीसाठी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. पोलिस अधिक तपास करतायेत.
Panaji Muncipal Corporation
पणजी महानगरपालिकेचे महापौर म्हणून रोहित बाबूश मोन्सेरात आणि उपमहापौर म्हणून संजीव नाईक यांची बिनविरोध निवड. पणजी महानगरपालिकेत आज पार पडली निवडणूक
नेपाळमधील धानगाधीचे महापौर यांची कन्या आरती गोपाळ हमाल (३६) गोव्यातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, आरती रात्रीच्या सुमारास शिवोलीत सापडली असून, सुखरुप आहे. आरती हरमल येथे ओशोच्या धान्यधारणा शिबिरात सहभागी होण्यासाठी आली आहे.
Goa Congress Loksabha Candidate
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, ॲड. रमाकांत खलप आणि विजय भिके दिल्लीला रवाना. पक्षश्रेष्ठींकडून पाचारण. आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. सायंकाळपर्यंत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.