Goa, Konkan Today's News: मला एवढ्यातचं दिल्लीत जायचे नाही, CM सावंत स्पष्टच बोलले!

Goa, Konkan Today's 22 May 2024 Live News: गोव्यातील गुन्हे, क्रीडा, कला, संस्कृती, राजकारण यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

मला एवढ्यातचं दिल्लीत जायचे नाही, CM सावंत स्पष्टच बोलले!

मला एवढ्यात दिल्लीत जायचे नाही. गोवेकरांची अजूनही काही वर्षे सेवा करण्याची इच्छा आहे. लोकांनी आणि देवाने तशी संधी दिलीय. दिल्लीत बढती मिळण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सोडले मौन.

CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

'ओपा'मध्ये बिघाड, तिसवाडीत पाणीबाणी

तिसवाडी तालुक्यातील विविध भागांत आज सकाळी पाणीपुरवठा न झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. अनेकांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या टँकरसाठी बुकिंग सुरू केले.

दिवसभर लोकांचे टँकरसाठी फोन घेताना तेथील कर्मचाऱ्यांचीही धांदल उडाली होती. काही लोकांनी जवळ असलेल्या विहिरींवर धाव घेतली. राज्यात पाऊस पडत असला तरी लोकांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची पाळी येत आहे.

ओपा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील वीज उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला असल्याची माहिती तिसवाडी कार्यकारी अभियंता थॉमस यांनी दिली. ओपा पाणी प्रकल्पात काल रात्री वीज उपकरणामध्ये बिघाड झाल्याने सकाळी ६ वाजता तिसवाडीतील काही भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

आज दुपारपर्यंत बिघाड दुरुस्त करण्यात आला व रोज संध्याकाळी ६ वाजता करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी फोंड्याहून तिसवाडीत पोहोचेपर्यंत ५ ते ७ तास लागणार आहेत. त्यामुळे मध्य रात्रीपर्यंत हे पाणी पोहचेल.

मये गावातील सरकारी जमिनीवर बांधलेल्या बांधकामांवर लवकरच हातोडा

मये गावात 2014 नंतर सरकारी जमिनीवर बांधलेली सर्व बांधकामे पाडली जाणार. सरकारच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम खपवून घेणार नाही. मये गावात जमिनी विकत घेणाऱ्यांनी आधी जमिनीची चौकशी करावी असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन.

आणखी एका अपघातात एकाचा मृत्यू

पंचवाडी शिरोडा येथे टॅंकर,अर्टीका,व ट्र्क यांच्यात झालेल्या अपघातात टॅंकर मधील महमद हा जागीच ठार तर तिघे जण जखमी.टॅंकर आडवा पडल्याने रस्ता वाहतूकीस बंद.फोंडा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर घटना स्थळी.तपास चालु.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

फोंडा येथील अपघातातल्या 'त्या' युवकाचा मृत्यू!

Ponda Accident

फोंडा उड्डाणपुलावरील स्वयं अपघातात दुचाकी चालक श्रवण हरी नाईक (१९ वर्षे,कुंडई) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू. वीज खांबाला दिली होती धडक.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

अटकेत असणारी श्रेया धारगळकर रुग्णालयात दाखल

Shreya Dhargalkar Case

श्रीदेवी कुंकळकारीण व श्रीदेवी लईराई यांच्याबाबत आक्षेपकार्य शब्द उच्चारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली संशयित श्रेया धारगळकरला म्हापसा जिल्हा (आझिलो हॉस्पिटल) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

पणजी शहर परिसरात पाण्याची वानवा

Water Shortage In Panjim

पणजी शहर परिसरातील नागरिकांना शुक्रवारी सकाळी नळाला पाणी न आल्याने समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळीही पाणी आले नसल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. नळाला पाणी न येण्याचे कारण काही समजू शकले नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते तसेच शहराच्या पाणी पुरवठा विभाग सांभाळणारे अभियंते फोन उचलण्याच्या मनस्थितीत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com