Goa Daily News Wrap: राजकारण, क्रीडा, गुन्हे आणि पर्यटन विश्वातील ठळक घडामोडींचा आढावा

20 March 2024 Goa and Konkan's Live Batmya and Updates in Marathi: गोव्यात दिवसभरात घडणाऱ्या ठळक घडमोडींचा आढावा.
Goa And Konkan Live Online News Update | Goa Congress
Goa And Konkan Live Online News Update | Goa CongressDainik Gomantak

भाजपविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

'विकसित भारत' च्या नावाखाली भाजप लोकसभा निवडणूक प्रचार करून आचारसंहितेचा भंग करीत असल्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी राहुल गांधींनी नारीशक्तीचा अपमान केल्याचे पुरावे द्यावे अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची मागणी.

 Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी झारखंडच्या एकाला अटक

Calangute News

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रोशन कुमार सतीश प्रसाद (30, रा. जनता नगर, पत्रातु रामगढ, झारखंड) याला अटक. कळंगुट पोलिसांनी खोबरोवाडो कळंगुट येथे बुधवारी छापा टाकत केली कारवाई. संशयित आरोपीकडून 6 ग्रॅम वजनाचे 60,000 किंमतीचे कोकेन जप्त.

Calangute Police
Calangute PoliceDainik Gomantak

रिसेप्शनिस्ट जॉर्ज मंडल खून प्रकरण; आरोपी मंजीत तोमरला जन्मठेप

आठ वर्षापूर्वी शिमेर-कांदोळी येथे एका हॉटेलचा रिसेप्शनिस्ट राजू ऊर्फ जॉर्ज मंडल याच्या खूनप्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मंजीत तोमर याला ठोठावली जन्मठेपची शिक्षा.

म्हाऊस सत्तरीत फायबर स्क्रॅप यार्डला आग, चाळीस हजारांचे नुकसान

Mhaus Sattari Fire News

म्हाऊस सत्तरीत बुधवारी दुपारी अनंत च्यारी यांच्या फायबर स्क्रॅप यार्डला आग. जवळपास चाळीस हजारांचे नुकसान. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. च्यारी यांचे घर जवळच असल्याने मोठा अर्नथ टळला.

Mhaus Sattari Fire News
Mhaus Sattari Fire NewsDainik Gomantak

दुर्दैवी! रेल्वेच्या धडकेत 15 रेड्यांचा मृत्यू

sanvordem railway station

धडे सावर्डे येथे रेल्वेच्या धडकेत 15 रेड्यांना दुर्दैवी मृत्यू. दोन रेडे जखमी. या ठिकाणी प्राण्यांसाठी जाळी लावण्यात आली होती ती कोणी तरी काढल्याने प्राणी थेट रेल्वे रुळावर येत आहेत.

स्पीड गव्हर्नर! टॅक्सी चालकांचा टोयोटा शोरूमवर मोर्चा

नवीन वाहनाला बसवलेले स्पीड गव्हर्नर काम करत नसल्याने टॅक्सी चालकांचा टोयोटा शोरूमवर मोर्चा. स्पीड गव्हर्नर काम करत नसल्याने आरटीओकडून वाहन पासिंग होत नसल्याने टॅक्सी चालक संतप्त.

Goa Taxi Owner's
Goa Taxi Owner'sDainik Gomantak

डॉक्टर वायफळ बडबड थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसची टीका

लुटारू आणि दरोडेखोरांवर कुत्रे भुंकतात. भाजप सरकारने गेल्या 11 वर्षात गोव्यातील सरकारी तिजोरी आणि जनादेश लुटला, म्हणूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निष्ठावंत आणि विश्वासू प्राणी कुत्र्याबद्दल द्वेष आहे.

राहुल गांधी यांचे गोव्यातील कुत्र्यांवर प्रेम आहे याचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर वायफळ बडबड थांबवा! अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानावर काँग्रेस पक्षाकडून टीका करण्यात आली.

कोलवाळ राष्ट्रीय महामार्गावर कार पलटी, चालक जखमी

राष्ट्रीय महामार्ग ६६ वर कोलवाळ येथे पर्यटक कार पलटी. कार चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याची माहिती.

सराईत गुन्हेगार सूर्यकांत कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

ताळगाव येथील सराईत गुन्हेगार सूर्या उर्फ सूर्यकांत कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला. पणजी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार रॉनी डिसोझाला अटक.

भाजप ST मोर्चाचे नेते समाजाची दिशाभूल करत आहेत - रुबर्ट पेरेरा

ST Political Reservation

अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्याचे सांगून भाजप ST मोर्चाचे नेते समाजाची दिशाभूल करत आहेत.

मात्र, प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही. आरजीपीने मिशन राजकीय आरक्षणला पाठिंबा दिल्याने सरकारला दिल्लीत शिष्टमंडळ घेऊन जावे लागले, रुबर्ट पेरेरा यांचा दावा.

दाबोळी विमानतळावरील CISF कर्मचाऱ्याचा मृत्यू

Dabolim Airport

दाबोळी विमानतळावरील CISF कर्मचारी नथुराम (55, रा. शांतीनगर, मूळ मध्य प्रदेश) यांचा मृत्यू. चिखली रुग्णालयात त्यांना दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. दाबोळी पोलिसांनी अनैसर्गिकरित्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरू.

Dabolim Airport Goa
Dabolim Airport GoaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com