Goa BJP: अमित पालेकरांना कोणीही धमकावलेले नाही: सोपटे

पालेकर यांनी राजकीय कारणास्तव प्रसिद्धीसाठी धमकीचे कुभांड रचले आहे.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

BJP entry case of Amit Palekar ॲड. अमित पालेकर यांना भाजप प्रवेशासाठी कोणी धमकावलेले नाही. ते खरे बोलत असतील, तर त्यांनी त्या भाजप नेत्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते दयानंद सोपटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले, पालेकर यांनी राजकीय कारणास्तव प्रसिद्धीसाठी धमकीचे कुभांड रचले आहे.

भाजप कार्यालयात प्रदेश उपाध्यक्ष दिलीप परुळेकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर आणि गिरीश उस्कैकर यांच्यासह त्यांनी ही पत्रकार परिषद संबोधित केली.

सोपटे म्हणाले, पोलिस प्रथमदर्शनी पुराव्याअभावी अटक करत नाहीत हे फौजदारी वकील म्हणून पालेकर यांना समजायला हवे. भाजपमध्ये कोणालाही धमकावून आणले जात नाही.

भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारा कोणीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. २०१७ नंतर दोन डझन नेते इतर पक्षातून भाजपमध्ये आले त्यांना कोणी धमकावलेले नव्हते. पालेकर यांनी बिनबुडाचे आरोप करून राजकीय स्वार्थासाठी प्रसिद्धी मिळवू नये.

परुळेकर म्हणाले, पालेकर यांनी भाजप प्रवेश करावा यासाठी त्यांना धमकावण्याइतकी भाजपची प्रत घसरलेली नाही आणि भाजप तेवढा लाचारही नाही. केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे.

Goa BJP
CM Pramod Sawant: उंडीर मलनिस्सारण प्रकल्‍पाबाबत मुख्‍यमंत्र्यांनी दिली गोंयकार’ कार्यक्रमात महत्वाची माहिती, वाचा..

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याने भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव अनेकांवर पडतो आणि ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतात. यापुढेही भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत आहे. भाजपमध्ये धमकावून, मारामारी करून कोणाला घेतले जात नाही. त्यांना प्रसिद्धी हवी आहे आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईला राजकीय रंग देण्याचा अयशस्वी प्रयत्न चालवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com