Aldona: रामतळे येथील MRF शेड बांधकामावर प्रशासनाचा ब्रेक; 2 जानेवारीला सुनावणी

Aldona: कोमुनिनाद प्रशासनाची कठोर कारवाई
MRF Shed Construction
MRF Shed ConstructionDainik Gomantak

Aldona: मागील काही दिवसांपासून रामतळे हळदोणा बार्देझ येथील सुरु असलेल्या MRF शेड बांधकामासंदर्भात एक महत्वाची अपडेट हाती येतेय. येथील कोमुनिनाद प्रशासनाने हळदोणा पंचायतीला रामतळे येथे चाललेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या संबंधी पुढील सुनावणी येत्या 2 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याचीही माहिती मिळतेय.

MRF Shed Construction
Bicholim News : सरकारी जागेतील अतिक्रमण जमीनदोस्त करणारच : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हळदोणा रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत कोमुनिनादने ग्रामपंचायतीचे सचिव-सरपंच यांना सर्वे क्रमांक 343/16 मधील सर्व कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी 2 जानेवारी 2024 रोजी होणार असून या बैठकीला सरपंच - सचिव यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसहित उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच या प्रकरणाविषयी आणखी एक अपडेट हाती येतेय ती म्हणजे रामतळे मंदिराजवळ थांबलेल्या एमआरएफ शेडच्या बांधकामावेळी ग्रामस्थांनी महिला पंच सदस्याच्या पुतळ्याचे दहन करण्याची जी घटना घडली त्याविरोधात सरपंच अश्विन डिसोझा आणि पंच सदस्य अभिज्ञा सातार्डेकर हे पोलिस तक्रार दाखल करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com