Goa Agriculture : यंदाचा पाऊस शेतीला पोषक : सर्वानंद सर्वणकर

Goa Agriculture : : काणकोणातील उकड्या तांदळाला राज्यभरातून मागणी
Goa Agriculture
Goa Agriculture Dainik Gomantak

Goa Agriculture :

काणकोणात यंदा खरीप भातपीक समाधानकारक येणार, असा विश्वास विभागीय कृषी कार्यालयाला आहे. काणकोणात १५ जुलैपर्यंत खरीप शेतीची कामे पूर्ण होतात. यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने पेरणीची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी व्यक्त केली.

काणकोण तालुक्यात काही वर्षांपूर्वी शेतीव्यवसायात मरगळ आली होती. मात्र, सरकारने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना, सोयीसवलती उपलब्ध केल्यामुळे आणि कोरोना महामारीनंतर युवा पिढी कृषी क्षेत्राकडे हळूहळू वळू लागली आहे. तालुक्यातील ३,९२० शेतकऱ्यांकडे कृषी कार्डे असून १,५५३ शेतकरी प्रधानमंत्री कृषी योजनेखाली आहेत. मात्र, अद्याप

सुमारे तीन हजार शेतकरी व बागायतदार वेगवेगळ्या कारणांसाठी कृषी कार्डापासून वंचित आहेत.

काणकोणमधील उकड्या तांदळाला राज्यभरातून मागणी आहे. कर्जत, ज्योतीचे उकडे तांदूळ सरासरी ४५ ते ५० रुपये किलो दराने विकले जातात.

हार्वेस्टिंग मशीनचे काम आणि हिशोब

शेतकऱ्यांना भातकापणीसाठी खासगी क्षेत्रातील हार्वेस्टिंग मशीन कृषी खात्याकडून उपलब्ध करून दिले जाते. त्याच्या एकूण खर्चावर अनुदान दिले जाते. कमीतकमी पाच मिनिटे काम केल्यानंतर ३३३ चौरस मीटर भातशेतीची कापणी मशीनद्वारे केली जाते. त्यासाठी २३३ रुपये आकारले जातात, त्यावर कृषी खाते ११७ रुपये अनुदान देते.

कृषी अनुदानाचा फायदा

भाताची लावणी ते कापणी, मळणी यासाठी यंत्राचा वापर केला जातो. कृषी खात्याच्या अनुदानाचा फायदा घेत सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व अन्य कृषी अवजारे घेतली आहेत. खरीप तसेच वायंगण भात लागवडीसाठी तरवा तयार करून त्याची लागवड केली जाते. बहुतेक खरीप भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाऊस न आल्यास या शेतीला काहीवेळा फटका बसतो.

खरीप भातशेती लागवडीखाली जमीन

१८०० हेक्टर

वायंगण भातशेती

लागवडीखाली जमीन

५० हेक्टर

तालुक्यात सर्वाधिक खरीप भातशेतीची जमीन गावडोंगरी पंचायत क्षेत्र

काणकोणात शेती व बागायती क्षेत्राखाली ९,१२० हेक्टर जमीन लागवडीखाली

खरीप हंगामात

२५० हेक्टर जमिनीत, रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमिनीत भाजी लागवड

३५०० हेक्टर

जमिनीवर

काजू लागवड

Goa Agriculture
Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

ज्योती, कर्जतला पसंती : काणकोणमधील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भातबियाण्यांना पसंती देतात. त्याशिवाय गोवा धन-३, रत्नागिरी-६ या भातबियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यासाठी कृषी खात्याकडून बियाण्यावर पन्नास टक्के अनुदान दिले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com