Urak Season in Goa: नवीन धारेचे ‘हुर्राक’ बाजारात दाखल

काजू पिकाचा हंगाम अजून जोमात सुरू झाला नसला, तरी महाराष्ट्र सीमेवरील काही भागातून काजू बोंडूंची आवक करून डिचोलीत काही ठिकाणी दारूभट्ट्याही पेटल्या.
Urak Season in Goa
Urak Season in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Urak Season in Goa Begins: काजू पिकाचा हंगाम अजून जोमात सुरू झाला नसला, तरी महाराष्ट्र सीमेवरील काही भागातून काजू बोंडूंची आवक करून डिचोलीत काही ठिकाणी दारूभट्ट्याही पेटल्या असून, नवीन धारेचे ‘हुर्राक’ बाजारात दाखल झाले आहे.

आम्ही यंदा दोनवेळा भट्ट्या पेटवून ‘हुर्राक’ गाळले, अशी माहिती बोर्डे येथील व्यावसायिक प्रितेश फोगेरी यांनी दिली. (Goan Jungle Juice)

स्थानिक बागायतींमध्ये आवश्यक बोंडू उपलब्ध झाल्यानंतर या व्यवसायाला गती येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

डिचोली तालुक्यात सध्या गावोगावी काजू पिकाचे वेध लागले असून, संतुलित हवामान राहिल्यास यंदा काजू पीक समाधानकारक येण्याची शक्यता आहे. कृषी खात्यानेही तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या काजूच्या झाडांना फळधारणा प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Urak Season in Goa
BLADE India: आता गोव्यात वैयक्तिक हेलिकॉप्टर सेवा सुरू! 'ब्लेड इंडिया'ने दिली माहिती

कोविड महामारीनंतर दोन वर्षांनी यंदा मुक्तपणे काजू बागायतींमध्ये फिरायला मिळणार असल्याने काजू बागायतदारांच्या चेहऱ्यावरही यंदा हास्य फुलले आहे. दुसऱ्या बाजूने मात्र यंदा आंबा पिकावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.

काजू पिकावर मिळणाऱ्या उत्पन्नातून बहुतेक कुटुंबांची वर्षभराची सहजपणे गुजराण होते. त्यामुळे बहुतेक बागायतदारांनी माळरानांसह भरड शेतजमिनीतही काजू कलमांची लागवड केली आहे.

संतुलीत हवामानामुळे सध्या डिचोलीत सर्वत्र काजूला समाधानकारक मोहोर धरला असून, बहुतेक भागांत फळधारणाही सुरू झाली आहे. काही भागांत बोंडूचे दर्शनही झाले आहे.

गेल्या महिन्यात झाला, तसा दमट हवामान व धुक्याचा प्रादुर्भाव यापुढे झाला नाही, तर यंदा पुढील 15 दिवसांत काजू पीक बहरात येण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांकडूनही तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काजू पिकाचे वेध लागल्याने बागायतदारांनी बागायतींनी साफसफाईची कामे पूर्ण केली आहेत. यंदा निसर्गाने साथ दिली तर काजू पीक भरपूर मिळेल. कारण सध्याचे हवामान पिकाला पोषक आहे. अजून तरी काजूला समाधानकारक आणि आशादायक मोहोर दिसत आहे. . - भिसो नाईक, बागायतदार, धुमासे-मेणकुरे

Urak Season in Goa
Goa Agriculture: फोंड्यातील ‘कृषिरत्न’ रजतने केली हरितक्रांती!

यंदा आंबा पीक धोक्यात

काजूच्या झाडांना समाधानकारक मोहोर आला असला तरी अद्याप आंब्यांच्या झाडांना अपेक्षेप्रमाणे मोहोर दिसून येत नाही. क्वचित आणि अल्प प्रमाणात सोडल्यास मोहोर धरण्याच्या वेळीच बहुतेक झाडांना नवी पालवी फुटली आहे.

त्यामुळे या झाडांना मोहोर धरण्याची आशा कमीच आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा दहा टक्केही आंब्यांच्या झाडांना मोहोर आलेला नाही, अशी माहिती डिचोली विभागीय कृषी अधिकारी दीपक गडेकर यांनी दिली.

डिचोली आघाडीवर

कृषिप्रधान डिचोली तालुका हा काजू पिकाबाबत आघाडीवर आहे. तालुक्यातील नार्वे, पिळगाव, सर्वण, कारापूर, मेणकुरे, मये ही काही गावे आघाडीवर आहेत. बहुतेक गावांतील माळराने, डोंगरमाथे काजूच्या झाडांनी व्यापलेले आहेत. काजू हे नगदी पीक असल्याने प्रत्येक बागायतदाराचे या हंगामाकडे लक्ष लागून राहाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com