गोवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळकरी विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे

Goa College Of Agriculture: हायस्कूलच्या ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भात रोपे कशी लावतात याची प्रात्यक्षिके दाखवली
Rice Farming by Students
Rice Farming by StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली मये येथील महामाया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतीचे धडे गिरवले. हायस्कूलच्या ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भात रोपे कशी लावतात याची प्रात्यक्षिके दाखवली आणि त्यांच्याकडून भात रोपे लावून घेतली.

महाविद्यालयाच्या अंकिता बगळे, सुश्मिता रेडकर, माझिया फर्नांडिस, सुझान कॉस्ता आणि मनीषा भावदान या विद्यार्थिनी सध्या रावे प्रकल्पांतर्गत मये येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तानिया गोवेकर यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना भातशेतीविषयक माहिती दिली. मुख्याध्यापिका गोवेकर यांनाही ही संकल्पना एवढी आवडली की त्याही विद्यार्थ्यांसोबत भातशेतीत उतरल्या.

Rice Farming by Students
Rice farming: शेतकरी भात कापणी यंत्राच्या प्रतीक्षेत

भात रोपे कशी काढायची व त्यांचे रोपण कसे करायचे याविषयी माहिती देत त्याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी दाखवली. त्यानंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्याचे अनुकरण केले.

भातशेतीकडे युवा पिढीने वळावे यासाठी भातशेतीविषयक त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करण्यासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याने आम्ही हा उपक्रम हाती घेतला होता, असे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com