Goa Artist : कलाकाराच्या अंगी सकस अभिनय क्षमता असावी : प्रा. अनिल सामंत

Goa Artist : पेडण्यात द्वितीय हौशी रंगभूमी नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Artist :

पेडणे, ‘मराठी रंगभू‌मीवर नाटक सादर करत असताना नाटकातील अभिनयात जगण्याचा दृष्टीकोण जेव्हा आपल्याला साध्य होईल, तेव्हाच ती कला नाट्य रसिकांसमोर खऱ्या अर्थाने बहरेल’, असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी येथे केले.

येथील हौशी रंगभूमी नाट्यस्पर्धा समिती आयोजित विजय चंद्रकांत तुळसकर दिग्दर्शित प्रभावती चंद्रकांत तुळसकर यांच्या स्मरणार्थ ‘द्वितीय रंगभूमी नाट्य स्पर्धा - २०२४’च्या बक्षीस वितरण सोहळयात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमु‌ख पाहुणे म्हणून माधव सिनाई देसाई, विशेष अतिथी म्हणून आनंद नाईक, खास निमंत्रित म्हणून राजू बोंद्रे, नरेंद्र गाड, हौशी रंगभूमी नाट्य स्पर्धा समितीचे संस्थापक विजय तुळसकर, श्री दत्त गिरी मठाचे प्रमुख कार्यवाह उमेश पार्सेकर आणि आयोजन समितीचे अध्यक्ष समिर कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Goa
Goa Top News: पेडण्यात संरक्षक भिंत कोसळली, पावसाची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. विजय तुळसकर यांनी प्रास्ताविक केले. या सभेत एकूण नऊ संघांनी भाग घेतला होता. त्यात प्रथम - तरुण हौशी नाट्य मंडळ, द्वितीय - श्री महापुरुष हौशी नाट्य मंडळ, तृतीय - श्री गावडेश्वर नाट्य मंडळ, तर उत्तेजनार्थ प्रथम - श्री राष्ट्रोळी तरुण हौशी नाट्य मंडळ, व्दितीय - श्री नागगावडा तरुण हौशी नाट्य मंडळ, तृतीय - बंदियेश्वर नाट्य मंडळ यांना बक्षिसे मिळाली. सर्व विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

ध्वनी संकलनासाठी नवनीत वेर्णेकर, प्रकाश योजनेसाठी अर्जुन नाईक यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देउन सत्कार करण्यात आला, तर देवाविस अजय गडेकर या कलाकाराला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गेल्या ३५ वर्षांत एक हजाराहून अधिक नाटकांना दिग्दर्शन दिलेल्या विजय तुळसकर यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com