गोव्याच्या इतिहासातला अभूतपूर्व जनमत कौल, 3 लाख परिवारांचा समावेश

गोव्याकडे आम्ही एक आदर्श राज्य म्हणून पाहातो, जिथे विकासाविषयीच्या नवकल्पनांना मूर्तरूप देताना महिला या अत्यंत महत्त्वाच्या घटकांना सामावून घेता येईल.
Goa: A brand new survey in state to be start from today involving 3 lakh families
Goa: A brand new survey in state to be start from today involving 3 lakh familiesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जनमानसाचा कानोसा घेणारा ‘जनमन उत्सव’ हा जनमत कौलाचा अभूतपूर्व असा महा-उपक्रम आजपासून दै. ‘गोमन्तक’ आणि ‘तनिष्का’ या महिलांसाठीच्या सशक्त व्यासपीठाच्या विद्यमाने कार्यान्वित होत आहे. या जनमत कौलांत आमचे प्रतिनिधी राज्यांतील तब्बल तीन लाख घरांना भेट देऊन विविध विषयांवरील महिलावर्गाची मते जाणून घेणार असून त्यातून राज्याच्या स्थायी विकासाचे प्रारूप साकारणार आहे.

गोव्याकडे आम्ही एक आदर्श राज्य म्हणून पाहातो, जिथे विकासाविषयीच्या नवकल्पनांना मूर्तरूप देताना महिला या अत्यंत महत्त्वाच्या घटकांना सामावून घेता येईल. इथली महिला आजही अप्रत्यक्षपणे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात स्वतःच्या अस्तित्वाचा आणि निर्णयक्षमतेचा ठसा उमटवते आहे. तिला निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणल्यास भावी वाटचालीचे सुस्पष्ट प्रारूप आपल्याला मिळू शकते. यासाठी ‘गोमन्तक’ने गोव्याचे पहिले मराठी दैनिक या नात्याने आपले कर्तव्य पार पाडायचा निर्धार केला आहे. सुजाण गोमंतकीय महिलांचे उत्स्फूर्त योगदान आम्हाला मिळावे, हीच अपेक्षा.

- अभिजीत पवार, व्यवस्थापकीय संचालक, गोमन्तक-सकाळ माध्यम समूह

1967 साली गोव्यात ऐतिहासिक असा जनमत कौल झाला आणि गोमंतकीयांनी आपली भाग्यरेषा रेखाटली. अशाच प्रकारचा कौल आज आवश्यक ठरला आहे. निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी महिलांनी असणे आज गृहित धरलेले असले, तरी राज्यातील लाखो महिलांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित कळीच्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्याची संधी देत राज्याचे भवितव्य रेखण्याची संधी हा ‘जनमन उत्सव’ देत आहे.

गोमंतकीय महिला खऱ्या अर्थाने गोव्याचे प्रतिनिधित्व करते. तिचे निरिक्षण अचूक असते आणि उत्पादन, संगोपन, निर्मिती अशा सर्व प्रक्रियांमध्ये तिचा अभ्यासू सहभाग असतो. असे असूनही तिला निर्णय प्रक्रियेत डावलण्यात येते, हा आजवरचा अनुभव आहे. विकासाचे सध्याचे असंतुलीत प्रारूप हा एकांगी नियोजनाचा परिपाक असून त्याला बदलताना महिलावर्गाला त्याचे हक्काचे स्थान दिल्यास चित्र सुसह्य होईल, याच धारणेतून हा ‘जनमन उत्सव’ स्फुरलेला आहे.

घरोघर भेट देणारे आमचे प्रतिनिधी त्यांच्यापाशी असलेल्या टॅबवर निवडक प्रश्नांवर महिला वर्गाची उत्तरे त्यांच्याकरवी नोंदवतील. या प्रतिक्रियांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलन केल्यानंतर गोमंतकीय महिलेला नेमके काय हवेय, याचे ठोस चित्र उपलब्ध होईल. गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या संकल्पनेतून हा ‘जनमन उत्सव’ साकारत आहे. त्यांनी स्थापन केलेले ‘तनिष्का’ हे महिलावर्गासाठीचे व्यासपीठ आज महाराष्ट्रात वेगळ्याच सामाजिक क्रांतीची प्रेरणा ठरते आहे. या व्यासपीठापासून प्रेरणा घेतलेल्या महिला सामाजिक अन्यायाच्या विरोधात संघटीतपणे उभ्या राहात आहेत आणि जलदुर्भिक्ष्यापासून व्यसनमुक्तीपर्यंतचा फार मोठा सामाजिक व्याप आपल्या कवेत घेत आहेत. तनिष्काचे कार्य जगातले अप्रूप बनते आहे. गोव्यातला हा उपक्रम तनिष्काच्या कार्याचा उत्कर्ष बिंदू ठरणार आहे. ‘जनमन उत्सवा’ची तयारी ‘गोमन्तक’ गेले तीन महिने करतो आहे. मा. अभिजीत पवार यांनी या काळात गोव्यातील महिला, युवक, उद्योजक, शिक्षक अशा विविध घटकांशी थेट संवाद साधला आहे.

या घटकांचे निरंतर सहकार्य संकल्पित प्रक्रियेदरम्यान आम्हाला मिळणार आहे. जनमन उत्सवातून उपलब्ध झालेल्या माहितीचे शास्रोक्त संकलन आणि परिशिलन करण्यासाठी प्री-लॅब या प्रयोगशाळेचे प्रयोजन आहे. राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर होऊ घातली आहे. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांतून आमच्या प्री-लॅबच्या माहितीचे प्रतिबिंब पडावे आणि विकासाच्या गोव्याला अपेक्षित असलेल्या प्रारुपासाठी आपण वचनबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी द्यावे यासाठी ‘गोमन्तक’ रेटा लावणार आहे. निवडणुकीनंतर प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने पोस्ट-लॅब प्रयोगशाळा कार्यान्वित होणार असून नवे सरकार विकास प्रारूपातील प्राथमिकतांपासून भरकटू नये यासाठी तिच्या माध्यमातून निरंतर यत्न केले जाणार आहेत. या प्रक्रियेतही गोव्यातील युवक, महिला, उद्योजक, शेतकरी व अन्य दबाव गटांचे योगदान असेल. निव्वळ गोव्याचे हित नजरेसमोर ठेवून ‘गोमन्तक’ने आरंभिलेल्या या कार्याला गोमंतकीय जनतेने, विशेषतः महिलावर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन ‘गोमन्तक’ परिवारातर्फे करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com