Samagra Shiksha Scam: समग्र शिक्षा योजनेच्या 5 कोटींचे घोटाळा प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग, मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पर्वरी पोलिसांना अपयश

Goa Samagra Shiksha Scam: गोवा समग्र शिक्षा अभियान योजनेशी संबंधित सुमारे ५ कोटींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची (मास्टरमाईंड) माहिती पर्वरी पोलिसांना माहीत असूनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही.
Samagra Shiksha Scam
Samagra Shiksha ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa education scam: गोवा समग्र शिक्षा अभियान योजनेशी संबंधित सुमारे ५ कोटींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची (मास्टरमाईंड) माहिती पर्वरी पोलिसांना माहीत असूनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. सध्या तो मोकाट असून वेळोवेळी ठिकाणे बदलत आहे. पर्वरी पोलिस स्थानकातील कमी मनुष्यबळअभावी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग केले आहे. क्राईम ब्रँचच्या पोलिस निरीक्षक संध्या गुप्ता यांच्याकडे ते तपासकामासाठी देण्यात आले आहे.

या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत पश्‍चिम बंगालमधून पर्वरी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे, त्यामध्ये रॉबिन पॉल, पुर्नाशिश साना, संतोष मोंडल, अलामिन मोंडल व बिद्याधर मल्लिक याचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराची माहिती या संशयितांकडून पोलिसांना मिळाली असली तरी त्याचा ठावठिकाणा लागत नाही.

पश्‍चिम बंगालच्या मदतीने त्याच्यावर नजर ठेवण्यात आली आहे. रॉबिन पॉल व पुर्नाशिश साना या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर इतर तिघांची पोलिस कोठडी येत्या ६ जूनपर्यंत आहे. या प्रकरणामागे मुख्य सूत्रधाराने या संशयितांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यावरून रक्कम हस्तांतरित करण्यासाठी मदत घेतली होती.

Samagra Shiksha Scam
Goa Taxi Issue: "राजकारण करु नका, वेळ आल्यास आमदारांच्या दारावर बसून भीक मागू", टॅक्सीचालकांचा सत्ताधाऱ्यांना संतप्त इशारा

या अभियानाच्या बँक खात्यातून अफरातफर झाल्याचा प्रकार मार्च २०२५ मध्ये बँकेच्या एका अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. अभियानचे संचालक शंभू घाडी यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.

हस्तांतरित झालेल्या रक्कमेचा शोध घेत पर्वरी पोलिस कोलकता येथे पोहचले व ही रक्कम हस्तांतरित झाली त्याचा शोध घेतला होता. कुशन व्यावसायिक असलेल्या संशयित रॉबिन पॉल याला कर्जाची गरज होती त्यामुळे मुख्य सूत्रधाराने त्याचा फायदा उठवत त्याला अभियानमधील हस्तांतरित केलेली रक्कम काढून दिल्यास त्याला कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते.

Samagra Shiksha Scam
Goa Monsoon Travel: मान्सूनमध्ये गोवा ट्रिप, फक्त बीचच नाही तर बरंच काही अनुभवा

गायब रक्कमेचा शोध सुरू

आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांच्या खातेधारकांचे बँक तपशील, सिम कार्ड, एटीएम कार्ड ताब्यात घेतले आहेत. या संशयितांना रक्कम हस्तांतरित करण्याच्या बदल्यात मुख्य सूत्रधाराकडून कमिशन मिळत होते.

अभियानच्या खात्यातून गायब झालेल्या ५ कोटींच्या रकमेचा शोध पोलिस घेत असले तरी अजून काही प्रमाणातच रकमेचा सुगावा लागला आहे. या प्रकरणात अनेक संशयितांचा समावेश असल्याने हे मोठे रॅकेट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com