Sameer Amunekar
पावसाळा म्हटलं की अनेक जण ट्रॅव्हलपासून दूर राहण्याचा विचार करतात, पण गोव्याचं खरं सौंदर्य मान्सूनमध्येच खुलून येतं.
जून ते सप्टेंबर दरम्यानचा काळ, जेव्हा सारा गोवा हिरवाईने नटलेला असतो, निसर्ग आपल्या भरात असतो आणि गर्दी तुलनेने कमी असते.
गोवा फक्त बीच पार्टीसाठीच नव्हे तर शांत आणि नैसर्गिक अनुभवांसाठी उत्तम पर्याय ठरतो.
मान्सूनमध्ये दूधसागरचा जलप्रपात प्रचंड वेगात वाहतो. धुक्याच्या ढगात हरवलेला हा धबधबा पाहणं म्हणजे स्वर्गसुखासारखं.
पावसाळ्यात नद्या भरून वाहत असतात. त्या वेळी मांडवी नदीवरील बॅकवॉटर क्रूझ किंवा बोट सफारीचा अनुभव घेताना पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार किनारी – हे सगळं मन मोहवून टाकतं.
मान्सून म्हणजे हॉट फिश करी, भात, पातोळे आणि फेणीचा आस्वाद घेण्याचा सर्वोत्तम काळ. स्थानिक हॉटेलं आणि होमस्टे यामध्ये अस्सल गोमंतकीय चव मिळते.