Goa: आमोण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. (Stray Dogs in Goa)
Goa: Stay Dogs in Amona.
Goa: Stay Dogs in Amona.Dainik Gomantak
Published on
Updated on

आमोणे : आमोणेतील (Amone, Goa) सातही प्रभागांत गेल्‍या तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs Issue) संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी माणसांच्या अंगावर धावून येतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Goa: Stay Dogs in Amona.
कोलवा सर्कलजवळ चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला आग

गेल्‍या महिन्यात शासकीय विद्यालयाजवळील मुख्य रस्त्यावरून स्कूटर घेऊन जाणारे उदय च्‍यारी यांच्या स्कूटरच्या समोर कुत्र्यांचे एक टोळके धावून आले. त्‍यातील एक कुत्रा चाकात सापडून च्‍यारी व त्यांच्यामागे बसलेला कामगार खाली कोसळून च्यारी यांना बरीच दुखापत झाली. त्‍यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्‍यात आले. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूच्या शेतात एक वासरू चारा खात असता अचानक सहा-सात कुत्र्यांचा कळप त्याच्या मागे लागला. त्यांना घाबरून पळणारे वासरू शेतातील चिखलात अडकल्यावर कुत्रे त्याचा चावा घेऊ लागले. हे दृश्‍‍य जवळील विठ्ठल मंदिरात असलेले पुजारी प्रेमानंद नाईक यांनी पाहिल्यावर त्‍यांनी एक काठी घेऊन त्या कुत्र्यांना तेथून पिटाळून लावले व वासराचा जीव वाचवला. अशा घटना वाढत असल्‍याने या भटक्‍या कुत्र्यांचा तत्‍काळ बंदोबस्त करावा, मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Reservation Latest News
Michael Lobo Bardez Development
Goa Taxi Fare Latest Update
Subhash Velingkar Marathi Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com