पणजी: शिक्षण खात्याने राज्यातील शाळा लवकर सुरु करण्याची चाचपणी करण्यासाठी किती शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली, याची माहिती देण्याचे आदेश देऊनही राज्यातील 55 शाळांनी अद्याप याबाबत माहिती शिक्षण खात्याला दिली नाही. या 55 शाळांत तिसवाडी तालुक्यातील तब्बल 33 शाळांचा समावेश आहे. यावरुन तिसवाडीतील शाळा सुस्त तथा सुशेगात असल्याचे दिसून येत आहे. (33 schools in Tiswadi taluka, goa have not provided any information about vaccination)
शिक्षण खात्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याने नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची चाचपणी सुरु केली होती. त्यासाठी 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्व शाळांतील किती शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे, याची माहिती शिक्षण खात्याला आज 4 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे कळवले होते. मात्र, आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत अद्यापही 55 शाळांनी माहिती पुरवलीच नाही.
आश्चर्यांची बाब म्हणजे यात तिसवाडी तालुक्यातील तब्बल 33 शाळांचा समावेश आहे. तसेच सासष्टीतील 9 शाळा, सत्तरी, केपे, मुरगाव व फोंडा तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळा आणि पेडणे, काणकोण, डिचोली व केपे तालुक्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. माहिती न दिलेल्या या सर्व शाळांना 6 ऑगस्टपर्यंत लसीकरणाचा अहवाल देण्याची ताकीद देण्यात आली असून तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दहावी व बारावीसाठी परिक्षा नियम जाहीर
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चालू शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीसाठी परिक्षा नियमावली जाहिर केली आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 गुणांची अंतर्गत चाचणी घेतली जाईल, तिच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न किवा लेख असतील. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये पहिली टर्मीनल परिक्षा 40 गुणांची व त्यानंतर मार्च- एप्रिलमध्ये दुसरी टर्मीनल परिक्षा 40 गुणांची घेतली जाणार आहे. या दोन्ही परिक्षांसाठी अभ्यासक्रमांची दोन विभागांत विभागणी करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट कायम राहीले तरी, या दोन्ही वर्गाच्या परिक्षा यंदा जशा अंतर्गत मुल्यांकन गुणांवर आधारीत शाळांच्या समित्यांनी तयार केला व जाहिर करण्यात आला, तसा निकाल जाहिर केला जाणार नाही. या दोन्ही वर्गांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रश्नपत्रिका (पेपर) तयार करणार आहे.
जर कोरोनाकाळ असाच राहिला तर सदर पेपर शाळांना पाठवून ते विद्यार्थ्यांना पोचवून परिक्षा घेण्यासाठी सांगितले जाईल आणि जर कोरोनाचे संकट कमी झाले तर यापुर्वी जशा बोर्डाच्या परिक्षा होत होत्या, त्यानुसार परिक्षा ऑफलाईन घेतल्या जातील. या परिक्षा नियमावलीला ‘टर्मीनल सिस्टीम’ नाव देण्यात आले असून ती बोर्डाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली असून विद्यार्थी व पालकांकडून काही सुचना असल्यास त्या 10 ऑगस्टपर्यंत स्विकारल्या जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.