'जोपर्यंत रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत...'; ग्‍लोबल कोकणी फोरमनं सरकारला ठणकावलं!

Global Konknni Forum: रोमी कोकणीला हा दर्जा देऊन या अन्‍यायाचे परिमार्जन करावे, अशी मागणी ग्‍लोबल कोंकणी फोरमतर्फे करण्‍यात आली.
'जोपर्यंत रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत...'; ग्‍लोबल कोकणी फोरमनं सरकारला ठणकावलं!
Global Konknni ForumDainik Gomantak

५८५ दिवसांचे उग्र आंदोलन करून कोकणीला गोव्‍यात राजभाषेचा दर्जा मिळाला, पण रोमी लिपीला डावलले गेले. रोमी कोकणीला हा दर्जा देऊन या अन्‍यायाचे परिमार्जन करावे, अशी मागणी ग्‍लोबल कोंकणी फोरमतर्फे करण्‍यात आली.

घोगळ जंक्‍शनवर उभारलेल्‍या कोकणी आंदोलनातील हुतात्‍मा फ्‍लोरियान वाझ यांच्‍या पुतळ्‍याजवळ रोमीप्रेमींनी एकत्र येऊन जोपर्यंत रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्‍याची शपथ घेतली. यावेळी रोमी लिपीतून लिहिणारे साहित्‍यिक आणि तियात्रिस्‍त या ठिकाणी जमले होते. हे आंदोलन राज्‍यव्‍यापी केले जाणार, असे यावेळी ग्‍लोबल कोकणी फोरमचे अध्‍यक्ष केनेडी आफोन्‍सो यांनी सांगितले.

रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा न देऊन फक्‍त रोमी प्रेमीवरच नव्‍हे तर ख्रिस्‍ती अल्पसंख्याक समाजावरही अन्‍याय झालेला आहे. हा अन्‍याय दूर करण्‍यासाठी पुन्‍हा एकदा उग्र आंदोलनाची गरज यावेळी व्‍यक्‍त केली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

'जोपर्यंत रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत...'; ग्‍लोबल कोकणी फोरमनं सरकारला ठणकावलं!
CM Pramod Sawant: ‘प्रवाह’मुळे कर्नाटकचे कारनामे उघड होणार’; मुख्यमंत्री सावंत बरसले

पुतळ्याला मान्यता हवी

कोकणी राजभाषा आंदोलनात आपल्‍या प्राणाची आहुती दिलेले फ्‍लोरियान वाझ यांच्‍या पुतळ्याला मडगाव पालिकेने अधिकृत मान्‍यता द्यावी आणि या पुतळ्‍याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी यावेळी अँथनी डिसिल्‍वा यांनी केली.कोकणी राजभाषा आंदोलनात आपल्‍या प्राणाची आहुती दिलेले फ्‍लोरियान वाझ यांच्‍या पुतळ्याला मडगाव पालिकेने अधिकृत मान्‍यता द्यावी आणि या पुतळ्‍याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी यावेळी अँथनी डिसिल्‍वा यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com