GIPARD: वळवई बनणार आदर्श पंचायत! ‘जीपार्ड’कडून दोन वर्षांसाठी दत्तक

Volvoi: या संस्थेने संपूर्ण गोव्यातील सहा ग्रामपंचायती दत्तक घेतलेल्या असून यापैकी फोंडातील फक्त वळवई पंचायतीला मान
Volvoi: या संस्थेने संपूर्ण गोव्यातील सहा ग्रामपंचायती दत्तक घेतलेल्या असून यापैकी फोंडातील फक्त वळवई पंचायतीला मान
Volvoi|GIPARDDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Institute of Public Administration and Rural Development

सावईवेरे: एला फार्म ओल्ड गोवा येथील गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था ( जीआयपीएआरडी) या प्रशासकीय संस्थेने गाव दत्तक योजने अंतर्गत फोंडा तालुक्यातील वळवई ग्रामपंचायतीचा समावेश केला असून यासंबंधीचे नियुक्ती पत्र नुकतेच वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

फोंडा तालुक्यातील एकमेव अशा वळवई ग्रामपंचायतीची या संस्थेने निवड केल्याने नागरिकांनी पंचायत मंडळाचे अभिनंदन केले आहे. या संस्थेने संपूर्ण गोव्यातील एकूण सहा ग्रामपंचायती दत्तक घेतलेल्या असून यापैकी फोंडा तालुक्यातील फक्त वळवई पंचायतीला हा मान मिळाला आहे.सदर नियुक्त पत्र ‘जीपार्ड’चे संचालक वासुदेव शेट्ये यांनी सरपंच विनायक वेंगुर्लेकर यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले. यावेळी त्यांच्यासोबत पंच सदस्य काशिनाथ नाईक, सर्वेश नाईक,पंचायत सचिव दिव्या सुर्लकर, ग्रामसेवक श्वेता गावडे, अधिकारी आर्लेट मास्कारेनस उपस्थित होत्या.

फोंडा तालुक्यातील क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने वळवई पंचायत ही छोटी पंचायत म्हणून ओळखली जाते. या दत्तक योजने अंतर्गत या संस्थेतर्फे पंचायत मंडळाला विविध नियोजनबद्द विकासात्मक कार्यासंबंधी मार्गदर्शन दिले जाणार असून गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Volvoi: या संस्थेने संपूर्ण गोव्यातील सहा ग्रामपंचायती दत्तक घेतलेल्या असून यापैकी फोंडातील फक्त वळवई पंचायतीला मान
Goa Smart Village: शिरोडा मतदारसंघामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्प सुरू! स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४’मध्ये घोषणा

दोन वर्षांसाठी दत्तक

या पंचायतीत एकूण पाच प्रभाग असून अनुभवी सरपंच विनायक वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पंच सदस्य एकत्रितपणे कार्यरत आहेत. घर कर संकलन, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी संबंधी सदर पंचायत उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याने वरील संस्थेने या पंचायतीची निवड केली असून ही पंचायत आदर्श पंचायत बनविण्यासाठी संस्थेने दोन वर्षांसाठी विकासात्मक कार्यासाठी दत्तक घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com