Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार 300 खोल्यांचे भव्य हॉटेल, 60 वर्षांसाठी झाला करार

Mopa Airport: मोपा विमानतळावरील हॉटेल 2027 मध्ये सुरू होईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
Manohar International Airport At Mopa Goa
Manohar International Airport At Mopa GoaGOX Twitter

Manohar International Airport At Mopa Goa

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MOPA) 300 खोल्यांचे भव्य जिंजर हॉटेल सुरु होणार आहे. यासाठी GMR गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (GGIAL) आणि IHCL च्या मालकीची उपकंपनी, रूट्स कॉर्पोरेशन (RCL) यांच्यात मुंबईत 60 वर्षांचा उप-परवाना करार झाला.

मोपा विमानतळावरील हॉटेल 2027 मध्ये सुरू होईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

जिंजर हॉटेल मुंबई आणि बेंगळुरूनंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हे तिसरे मोठे हॉटेल असेल, असे IHCL व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल म्हणाले. या हॉटेलच्या समावेशासह, IHCL ची गोव्यात 15 हॉटेल्स असतील, यामधील चार हॉटेलचे सध्या बांधकाम सुरु आहे.

Manohar International Airport At Mopa Goa
Mopa Airport: कोट्यवधींचा घोटाळा? मोपा विमानतळावरील भूखंड सब-लीज वाढीवरुन वाद का होतोय?

दरम्यान, गोवा मंत्रिमंडळाने अलिकडेच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भूखंड सब-लीजला 40 वर्षावरुन 60 वर्षांच्या वाढीसाठी मंजुरी दिली. भूखंडांच्या भाडेतत्त्वाला दिलेल्या वाढीवरुन नवा वाद सुरु झाला आहे.

भाडेपट्टा मंजुरीत योग्य प्रक्रिया आणि कायदेशीर नियमांचे पालन न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे असे म्हणत निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com