Goa Ganesh Chaturthi|सत्तरीच्या महिला घुमट आरतीतही सरस

तालुक्यात पाच मंडळे : राज्यभरात 50 हून अधिक आरती मंडळे कार्यरत
Goa Ganesh Festival
Goa Ganesh FestivalDainik Gomantak

सपना सामंत

वाळपई : ‘हम किसी से कम नही’, असे म्हणत सध्या महिला सर्वच क्षेत्रांत दमदार पदार्पण करताना दिसत आहेत. एकेकाळी गोव्यात केवळ पुुरुषांची घुमट आरती मंडळे दिसायची. आता राज्यात 50 हून अधिक मंडळे महिलांची आहेत. यात सत्तरीतील महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम मोर्ले काॅलनी येथील रामकृष्ण गावस यांनी केले आहे.

(Ghumat Aarti was performed by women in sattari)

Goa Ganesh Festival
Goa Road Condition: खांबांवरील रस्‍त्‍याचे बांधकाम अखेर सुरू

पूर्वी सण व इतर कार्यक्रमांत महिलांचा क्वचितच सहभाग असायचा. पण आता काळ बदलला आहे. आता कुठलेही धार्मिक विधी असो वा भजन, घुमट आरती, फुगडी, रणमाले तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांत महिलांचा सहभाग वाढतच आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण त्या महिलांना गरज असते ती कौतुकाची, सहकार्याची आणि प्रोत्साहनाची. असेच अपेक्षित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन सत्तरीतील महिलांना मिळाले, ते म्हणजे मोर्ले काॅलनी येथील रामकृष्ण गावस यांचे. रामकृष्ण गावस यांनी आतापर्यंत सत्तरीतील महिलांना घुमट आरतीचे प्रशिक्षण देऊन लोककला जपली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. या महिलांनी विविध ठिकाणी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत.

स्पर्धांचे आयोजन गावोगावी व्हावे!

यावेळी रामकृष्ण गावस म्हणाले, पुरुषांसाठी गेली अनेक वर्षे घुमट आरती स्पर्धा होत. आता महिला तसेच बालमंडळ कलाकारही या स्पर्धांमध्ये सहभागी होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून घुमट आरती मंडळांची संख्या वाढत आहे. पण त्यानुसार स्पर्धांचे आयोजन होत नाही. त्यामुळे घुमट आरती मंडळांना कलेचे प्रदर्शन करायला वाव मिळत नाही. गणेश चतुर्थी काळात महिला मंंडळांचा मोठा सहभाग होता. आता खास करून युवती या क्षेत्रात पुढे येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com