Goa Cricket Association : केतन भाटीकरना दिलासा

जीसीए आमसभेच्या शिफारसीस स्थगिती, बडतर्फीऐवजी कारणे दाखवा
Ketan Bhatikar
Ketan BhatikarDainik Gomantak

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) आमसभेने डॉ. केतन भाटीकर यांचे आजीव सदस्यत्व बडतर्फ करण्याची शिफारस संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीला केली होती. कार्यकारिणीने मंगळवारी झालेल्या बैठकीत या त्यास स्थगिती देताना संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय एकमताने घेतल्याची माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जीसीए आमसभा 12 मार्च रोजी झाली होती. त्यावेळी संघटनेच्या विरोधात वावरणारे, संघटनेला बदनाम करणारे डॉ. केतन भाटीकर यांना संघटनेत का ठेवतात अशी विचारणा क्लबांनी केली होती. संघटनेच्या आजीव सदस्यपदावरून भाटीकर यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आमसभेत बहुमताने मांडण्यात आला होता. त्यांच्या बडतर्फीचा कालावधी किती असेल हे व्यवस्थापकीय समितीने ठरवावे असेही त्या बैठकीत ठरले होते.

Ketan Bhatikar
North Goa Police: निधीन वल्सन यांच्या पेट्रोलिंग मोहीमेमुळे उडाली वाहनचालकांची तारांबळ; अनेकांवर गुन्हा दाखल

जीसीए वैद्यकीय संचालकपदावरुनही भाटीकर यांना हटवण्याचा निर्णयही आमसभेत झाला होता. 2018 मधील जीसीएल स्पर्धेतील बक्षीस रक्कम भाटीकर यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी सूचना आमसभेत क्लबनी जीसीए व्यवस्थापकीय समितीला केली होती.

या संदर्भात रोहन यांनी मंगळवारच्या बैठकीनंतर सांगितले, की ``आजच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत भाटीकर यांना वैद्यकीय संचालकपदावरून हटविण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. आजीव सदस्यत्व बडतर्फ करण्यापूर्वी त्यांना संबंधित बक्षीस रक्कमप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरले.

"भाटीकर यांच्या उत्तरानंतर संबंधित प्रस्ताव पुन्हा आमसभेत क्लबांसमोर मांडण्यात येईल व अंतिम निर्णय घेतला जाईल.`` जीसीए कार्यकारिणीच्या निर्णयाने आजीव सदस्यत्वप्रकणी भाटीकर यांना सध्या दिलासा मिळाला आहे.

Ketan Bhatikar
Mopa Airport: मोपा जोमात! 77 दिवसांत सहा लाख प्रवासी, दिवसाला टॅक्सीच्या 4,500 फेऱ्या

महिला प्रीमियर लीग 1 एप्रिलपासून

  • जीसीए मान्यतेने खासगी संस्थेद्वारे राज्यातील महिला क्रिकेटपटूंसाठी 1ते 9 एप्रिल या कालावधीत गोवा महिला प्रीमियर लीग टी-20 स्पर्धा

  • एकूण ५ संघांचा समावेश, दिन-रात्र पद्धतीने सामने

  • साखळी फेरी पद्धतीने १२ सामने, अव्वल २ संघ अंतिम फेरीत

  • लिलावात राज्यातील एकूण १४७ महिला क्रिकेटपटू, प्रत्येक संघात ३ आऊटस्टेशन खेळाडू

  • विजेत्या संघाला २ लाख रुपये, उपविजेत्या संघाला १ लाख रुपये

इतर निर्णय

  • संघटनेचा मडगाव क्रिकेट क्लबशी (एमसीसी) सामंजस्य करार, त्यानुसार पूर्ण क्रिकेट अकादमी व सराव नेट सुविधा

  • एप्रिलमध्ये सीनियर पुरुष, १९ वर्षांखालील मुलगे, महिला क्रिकेटपटूंसाठी शिबिरसत्र

  • तिन्ही गटातील क्रिकेटपटूच्या शिबिरासाठी व्यावसायिक प्रशिक्षकाची नियुक्ती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com